VIDEO : खोदकाम करताना सापडला मौल्यवान खजिना, बघून अवाक् झाले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 11:26 AM2024-02-21T11:26:39+5:302024-02-21T11:28:07+5:30

Viral Video : या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, जमिनीत खोदकाम केलं आहे. तिथे काही रत्नांच्या अंगठ्या सापडल्या आहेत.

VIDEO : Treasure found digging ground found precious rings made of metals gems | VIDEO : खोदकाम करताना सापडला मौल्यवान खजिना, बघून अवाक् झाले लोक!

VIDEO : खोदकाम करताना सापडला मौल्यवान खजिना, बघून अवाक् झाले लोक!

Treasure Found: पृथ्वीखाली असे अनेक रहस्य दडलेले असतात ज्यांच्याबाबत खुलासा झाल्यावर लोक अवाक् होतात. यातील काही रहस्य हे ऐतिहासिक गोष्टींची निगडीत असतात. तर काही गोष्टी फारच धक्कादायक असतात. अनेकदा हजारो वर्ष जुना खजिनाही लोकांच्या हाती लागतो. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, जमिनीत खोदकाम केलं आहे. तिथे काही रत्नांच्या अंगठ्या सापडल्या आहेत. त्या एक व्यक्ती काढण्यासाठी पाणी टाकत आहे. एकानंतर एक त्याच्या हाती हजारो वर्ष जुना खजिना लागतो. त्याला धातुपासून बनवलेल्या आणि त्यावर रत्न असलेल्या महागड्या अंगठ्या सापडतात. पण या अंगठ्या हातांच्या हाडांमध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे या अंगठ्या त्याला एका मृतदेहाच्या बोटात सापडल्या. 

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ @_.archaeologist नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. ज्याला 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, अविश्वसनीय खजिना शोधण्याचा क्षण. पण लोकांनी या व्हिडिओच्या सत्य असण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका यूजरने लिहिलं की, मला आनंद आहे की, हे खोटं आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, असं वाटत आहे की, अंगठ्या कालच खरेदी केल्या असतील.

तर काही लोक असेही आहेत ज्यांचा या व्हिडिओवर विश्वास आहे. हा व्हिडीओ खरा आहे खोटा यावर आम्ही अजिबात दावा करत नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि त्यावर चर्चा सुरू आहे म्हणून आमच्या वाचकांसाठी तो घेऊन आलोत.

Web Title: VIDEO : Treasure found digging ground found precious rings made of metals gems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.