Video: एका नागिणीसाठी २ किंग कोब्रा आपसात भिडले; तब्बल ५ तास भीषण संघर्ष, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 02:00 PM2022-02-11T14:00:18+5:302022-02-11T14:00:56+5:30
भारतात जंगलातील किंग कोब्रा मोठ्या प्रमाणात आढळतात. परदेशी लोकं यावर डॉक्यूमेंट्री बनवण्यासाठी येतात
मेटिंग सीजनच्या जवळपास ३ महिने झाल्यानंतर २ नागांमध्ये भीषण लढाई झाली. या लढाईचं कारण म्हणजे नागिण होती. किंग कोबरा जंगलात असणाऱ्या एका नागिणीला आकर्षित करण्यासाठी फुंकारे मारत होता जेणेकरुन नागिण त्या वासाने जवळ येईल. परंतु हे करत असताना आणखी एक नाग त्याठिकाणी होता. एक नागिण आणि दोन नाग आमनेसामने आल्यानं नागांमध्ये लढाई सुरु झाली. नागिणीसाठी दोन नाग आपापसात भिडले.
जंगलात भिडले २ किंग कोब्रा
भारतात जंगलातील किंग कोब्रा मोठ्या प्रमाणात आढळतात. परदेशी लोकं यावर डॉक्यूमेंट्री बनवण्यासाठी येतात. नाग आणि नागिण या घटनेची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या यूट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, फीमेल किंग कोब्राला इम्प्रेस करण्यासाठी मेल किंग कोब्रा सातत्याने फुंकारे मारत होता. परंतु तेव्हा त्याठिकाणी आणखी एक मेल किंग कोब्रा आला. तेव्हा दोन्ही किंग कोब्रा एकमेकांना भिडले. जवळपास ५ तास दोघांनी लढाई सुरु होती. लढत-लढत ते दोघंही खूप दूरपर्यंत निघून गेले होते.
दोघांच्या लढाईत काय घडलं?
अखेर २ मेल किंग कोब्रामधील एक जण हार मानून जंगलातील दुसऱ्या दिशेने निघून गेला. त्यानंतर जिंकलेला कोब्रा फिमेल नागिणीकडे गेला आणि दोघंही एकत्र निघून गेले. ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला यूट्यूबवर स्मिथ सनिअन चॅनेलनं अपलोड केला आहे. आतापर्यंत २ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. यूट्यूबवरील व्हिडीओ डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलंय की, २ मेल किंग कोब्रामध्ये एका नागिणीमुळे आक्रमक संघर्ष झाला. दोन्ही नागांमध्ये चाललेले युद्ध नागिण पाहत आहे. त्यातील विजेत्या नागाचं स्वागत करण्यासाठी ती वाट पाहत आहे.