Video - "एक कमवायचा 9 जण खायचे म्हणून नोकरी, चाकरी, सॅलरी"; महिलेने सांगितलं लॉजिक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:11 PM2024-02-29T12:11:27+5:302024-02-29T12:20:49+5:30
महिला सॅलरी, वेतन आणि नोकरीबद्दल काहीतरी सांगत आहे. या विषयावर महिलेने असं काही लॉजिक दिलं आहे की व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले.
सोशल मीडियावर आपल्याला दररोज काहीतरी नवीन आणि अनोखं पाहायला मिळतं. अनेक वेळा आपल्याला असे व्हिडीओ देखील बघायला मिळतात ज्यातून आपल्याला काही महत्वाची माहिती कळते. कधीकधी असे काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला सॅलरी, वेतन आणि नोकरीबद्दल काहीतरी सांगत आहे. या विषयावर महिलेने असं काही लॉजिक दिलं आहे की व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले.
महिलेचं भरभरून कौतुक केलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला तिला माहीत असलेल्या माहितीनुसार, वाढतं उत्पन्न आणि महागाईवर आपलं मत देत आहे, जे खूपच इन्ट्रेस्टिंग आहे. व्हिडिओमध्ये ती महिला म्हणते की, पूर्वी एका व्यक्तीच्या नोकरीवर अनेक जण अवलंबून असायचे आणि संपूर्ण घर चालवायचे, पण आता फक्त एका व्यक्तीचा खर्च भागवणं देखील एकट्याच्या पगारात कठीण झालं आहे.
महिला व्हिडीओमध्ये म्हणते की, "असं म्हणतात की, जितक्या वेगाने उत्पन्न वाढत आहे, त्याच वेगाने महागाईही वाढत आहे. पूर्वीच्या काळी एका माणसाने कमावले तर नऊ लोक जेवायचे... तेव्हा त्याला नोकरी म्हणायचे. त्यानंतर एक माणूस कमवायला लागला आणि चार माणसे खायला लागली, मग त्याला चाकरी म्हणायला लागले. त्यानंतर, जेव्हा एखादी व्यक्ती कमाई करू लागला तेव्हा ते त्यालाच पुरायचं म्हणून त्याला पगार म्हणायचे आणि आता एक जण कमावतो पण ते त्याला देखील पुरत नाही म्हणून त्याला वेतन म्हणतात. आजकाल मुलं-मुली फक्त सेल फोनसाठी काम करतात, म्हणून त्याला सॅलरी म्हणतात."
@divyasinha266 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 5 लाख 62 हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. लोकांना महिलेचे हे लॉजिक खूप आवडलं आहे आणि ते मजेदार आहे. लोक महिलेचे कौतुक करत आहेत आणि व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.