VIDEO: तुला कापू का..? कोंबडी म्हणते 'नको, नको'; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 02:02 PM2021-02-03T14:02:12+5:302021-02-03T14:09:18+5:30
भन्नाट व्हिडीओची सर्वत्र चर्चा; व्हिडीओ सांगलीतील असल्याचा दावा
गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात कोरोनानं धुमाकूळ घातला. दिवसागणिक कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असल्यानं नागरिकांच्या मनात प्रचंड भीती होती. त्यातच चिकन खाल्ल्यानं कोरोना होत असल्याची अफवा पसरली आणि पोल्ट्री व्यवसायिकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यानंतर आता बर्ड फ्लूचं संकट आल्यानं पोल्ट्री व्यवसायिक चिंतेत आहेत. ग्राहकांनी दुकानांमध्ये पाठ फिरवल्यानं व्यवसायिकांना नुकसान सोसावं लागत आहे. मात्र सांगलीतल्या एका कोंबडीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
कोरोना काळात लोकांना बकरीसोबत झूम कॉलची दिली ऑफर, अशीच केली ५० लाख रूपयांची कमाई.....
कोणत्याही व्यक्तीला आपला जीव प्रिय असतो, असं म्हणतात. याची प्रचिती व्हायरल व्हिडीओमधून येते. खाटिक कोंबडीला सुरा दाखवून 'तुला कापू का' असं विचारतो. त्यावर कोंबडी 'नको नको' म्हणते. हा व्हिडीओ सांगलीतील दुकानाचा असल्याचं समजतं. अवघ्या ३० सेकंदांच्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. खाटिकाला मान हलवून 'कापू नको' असं सांगणारी कोंबडी तुफान व्हायरल झाली आहे.
खाटिकानं 'कापू का' विचारताच कोंबडी म्हणते 'नको नको'; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/mNPOOe9YpT
— Lokmat (@MiLOKMAT) February 3, 2021
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खाटकाच्या हातात सुरा दिसत आहे. त्यानं दुसऱ्या हातात कोंबडी धरली आहे. खाटिक वारंवार कोंबडीला तुला कापू का विचारतो. त्यावर प्रत्येक वेळी कोंबडी नको नको असं म्हणते. त्यामुळे अखेर खाटिक कोंबडी कापत नाही. तो तिला तिथेच ठेवून दुसरीकडे निघून जातो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय सांगता? १८० वर्ष जगण्यासाठी हा माणूस करतोय भलताच जुगाड; आतापर्यंत खर्च केले इतके पैसै
बर्ड फ्लूमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अनेक पोल्ट्री व्यवसायिकांना कोंबड्या नष्ट कराव्या लागल्या. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं. वर्षभरात दोनदा पोल्ट्री व्यवसायिक अडचणीत आले आहेत.