बापरे! रस्त्याच्या कडेला पांढरी चादर ओढून झोपलेल्या माणसाला लोक मृतदेह समजले अन् मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 04:24 PM2020-09-10T16:24:58+5:302020-09-10T17:46:42+5:30
या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक माणूस पांढरी चादर ओढून झोपला आहे.
कोरोना काळात अनोळखी माणसांबाबत सगळ्यांच्याच मनात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. अनोळखी व्यक्तीसमोर जायला किंवा त्याच्याशी बोलायलाही भीती वाटते. अशात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक माणूस पांढरी चादर ओढून झोपला आहे.
आजकल लोग चैन से सोने भी नहीं देते.😂😅
— Awanish Sharan (@AwanishSharan) September 9, 2020
सौजन्य pic.twitter.com/Jd7ad70q2w
कोरोना काळात हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. IAS अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा माणूस मृत असावा असं समजून पाहण्यासाठी तिथे गर्दी जमा होते. येणारे जाणारे लोक आपली वाहनं थांबवून त्या झोपलेल्या माणसाला पाहून कुजबूज करताना दिसून येतील. लोकांची गर्दी आणि आवाज ऐकून पाहून हा माणूस घाबरून उठून उभा राहिला. हे पाहून जमा झालेले लोक मृत माणूस जिवंत झाला या भ्रमात पळून गेले.
या माणसाला उठून उभं राहिलेलं पाहून लोकांच्या हसण्याचा आवाज व्हिडीओमध्ये येत आहे. अवनीश यांनी हा व्हिडीओ शेअर करताना आजकाल लोक शांतपणे झोपूही देत नाही' असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत ९ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक आणि रिट्वीट केलं आहे.
हे पण वाचा-
CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...
चिंताजनक! भारतातही ऑक्सफोर्ड लसीची चाचणी रोखली; सीरम इन्स्टिट्यूटनं सांगितलं की....