Video: अरे हे काय! यमराजाची लांब उडी स्पर्धा, भूत-चेटकीण झाले स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:19 PM2024-08-28T16:19:49+5:302024-08-28T16:21:48+5:30

Viral Video News: रस्त्यांची झालेली चाळण आणि प्रवाशांचे हाल... काही अपवाद सोडले तर ही आता प्रत्येक शहराची व्यथा झाली आहे. खड्डेमय ररस्त्यांना वैतागून काही जणांनी थेट यमराजाची वेशभूषा करत स्पर्धा भरवली, ज्यात भूते स्पर्धक झाले. 

Video: What is this! Yamaraja's fierce competition, the ghost-sorceress's long jumps | Video: अरे हे काय! यमराजाची लांब उडी स्पर्धा, भूत-चेटकीण झाले स्पर्धक

Video: अरे हे काय! यमराजाची लांब उडी स्पर्धा, भूत-चेटकीण झाले स्पर्धक

Social Media Viral Video: रस्त्यावर मोठंमोठे खड्डे, बाजूला यमराज आणि लांब उड्ड्या मारणारी भूते! सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यमराजाने आयोजित केलेल्या या लांब उड्डी स्पर्धेने रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असल्याचे अधोरेखित केले आहे. 

शहरांमध्ये खड्डेमुक्त रस्ते अशक्य गोष्ट होऊन बसली आहे. निकृष्ट दर्जाची कामे आणि वाहनांची वर्दळ यामुळे पाऊस झाला की रस्त्यांची चाळण होते. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांचे बळी गेले. आताही दररोज कुठे न कुठे लोकांना जीव गमवावा लागतो. याच मुद्द्यावर हटके पद्धतीने आंदोलन करण्यात आलेय.

खड्ड्यांवरील लांब उड्डी स्पर्धेचा हा व्हिडीओ आहे कर्नाटकातील उडुपी शहरातील. उडुपी शहर आणि मलापे समुद्र किनाऱ्याला जोडणाऱ्या रोडवर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. यात शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर किती मोठंमोठे खड्डे पडले आहेत, हे दिसत आहे.    

भूतांच्या लांब उड्या, यमराज घेताहेत माप

यमराज, भूत आणि चेटकिणीची वेशभूषा करून हटके पद्धतीने खड्ड्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. 

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यावरून भूते आणि चेटकिणीच्या वेशभूषेतील आंदोलक उड्ड्या मारत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 

Web Title: Video: What is this! Yamaraja's fierce competition, the ghost-sorceress's long jumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.