Video: शिकारीसाठी बिबट्या थेट झाडावर चढला; माकडानं असं डोकं लावून जीव वाचवला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 12:48 PM2020-10-18T12:48:48+5:302020-10-18T12:51:38+5:30
Viral News in Marathi : झाडाच्या फांदीला लटकणारं माकड आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे.
(image Credit- Dailymail)
बिबट्या शिकार करण्यासाठी काहीही करू शकतो. आतापर्यंत बिबट्या विहिरीत किंवा घरात शिरल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहीले असतील. सध्या बिबट्याच्या शिकारीचा असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बिबट्या शिकार करण्यासाठी झाडावर चढला आहे. झाडाच्या फांदीला लटकणारं माकड आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे.
Size, strength & reputations takes a back seat many times in Nature..
— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 5, 2020
Rarely seen, leopard trying to shake the monkey from tree for food. Monkey holds on🙏
It’s better than monkey defending itself from king cobra that I had posted earlier. pic.twitter.com/EjyMshPNwg
बिबट्या माकडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे पण पोहोचू शकत नाही. जोरात फांदी हलवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून माकड खाली पडेल. पण माकडाने झाडाच्या फांदीला घट्ट पकडून ठेवलं आहे. शेवटी हरल्याप्रमाणे शिकार न करताच बिबट्या खालच्या दिशेने जाण्यास तयार होतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. देवमासा ठरला देवदूत! Whale ने केली उलटी अन् 'तो' करोडपती झाला ना राव....
नंदा यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, अनेकदा ताकद, प्रतिष्ठा, आकार असतानाही निसर्गापुढे हार मानावी लागते. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत १ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी माकडाच्या चतुराईचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इगतपुरी परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याने चार पिल्लांना जन्म दिला होता. Video: गावात विकास झालाय का? असं रिपोर्टरने विचारलं, अन् आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल