Video : वाईनची बॉटल उघडायच्या नादात भलतंच घडलं; पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:35 PM2020-05-06T14:35:49+5:302020-05-06T14:42:26+5:30

या व्हिडीओत एक महिला घरी तयार केलेली वाईनची बॉटल उघडण्याचा प्रयत्न करते.  बॉटल उघडताना नक्की काय झालंय हे तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता.

Video: When women open homemade wine bottle watch viral video myb | Video : वाईनची बॉटल उघडायच्या नादात भलतंच घडलं; पाहून पोट धरून हसाल

Video : वाईनची बॉटल उघडायच्या नादात भलतंच घडलं; पाहून पोट धरून हसाल

Next

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे लोक आपापल्या घरी वेळ घालवताना दिसून येत आहेत. गेल्या काही  दिवसात सोशल मीडियावर लोकांच्या अनेक करामती आणि विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकानं सुरू नव्हते. अलिकडे काही प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. बरेच दिवस बंद असलेली मद्याची दुकानं सुरू  होणार  हे ऐकून तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि मग दारू खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली. असाच एक व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.  

या व्हिडीओत एक महिला घरी तयार केलेली वाईनची बॉटल उघडण्याचा प्रयत्न करते.  बॉटल उघडताना नक्की काय झालंय हे तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ Rex Chapman या यूजरने सोशल मीडीयावर शेअर केला आहे. यात कॅप्शन असं लिहिलं आहे की होममेड वाईन बॉटल उघडण्याआधी ती फर्मेटेंड असायला हवी याची काळजी घ्या. (हे पण वाचा-Video : मोराला उडताना पाहून कोरोनाचा सगळा ताण विसरून जाल, पाहा नयनरम्य दृश्य)

ही महिला  व्हिडीओ रेकॉर्डींग करत असताना वाईनची बॉटल उघडण्याचा प्रयत्न करते. पण चुकीच्या पद्धतीने वाईनच्या बॉटल उघडल्यामुळे संपूर्ण वाईन तिच्या अंगावर पडते. वाईनची बॉटल उघडल्यानंतर एखादी गोळी चालवल्याप्रमाणे आवाज येतो.  हा व्हिडओ सोशल मीडीयावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला ८ लाख व्हिव्हज आणि २१ हजार लाईक्स मिळाले आहेत. (हे पण वाचा-शिकाराच्या शोधात असलेला सिंह थेट शाळेतच शिरला; मग झालं असं काही, पाहा व्हिडीओ)

Web Title: Video: When women open homemade wine bottle watch viral video myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.