Video: धक्कादायक! कारमधून उतरताच महिलेवर वाघाचा हल्ला; ओढत जंगलात घेऊन गेला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 03:23 PM2022-11-02T15:23:03+5:302022-11-02T16:15:43+5:30

तुम्ही जंगली प्राण्यांनी माणसांवर हल्ले केल्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण, हा व्हडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

Video: Woman attacked by tiger, he took her into jungle | Video: धक्कादायक! कारमधून उतरताच महिलेवर वाघाचा हल्ला; ओढत जंगलात घेऊन गेला...

Video: धक्कादायक! कारमधून उतरताच महिलेवर वाघाचा हल्ला; ओढत जंगलात घेऊन गेला...

googlenewsNext

अनेकदा रस्ते घणदाट जंगलातून जातात. या जंगलातील रस्त्यांवर अनेकदा प्राण्यांशी सामना होतो. जंगलातून जात असताना गाडीतून खाली उतरू नका, असा इशारा अनेकदा प्रशासनाकडून दिला जातो. पण, तरीदेखील काहीजण खाली उतरतात. अशावेळी अनेकदा धक्कादायक घटना घडतात. अशाच प्रकारची घटना एका महिलेसोबत घडली आहे.

तुम्ही आतापर्यंत जंगली प्राण्यांनी माणसांवर हल्ले केल्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वाघ महिलेला कारमधून खेचून जंगलात घेऊन गेल्याचे दिसत आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ जुना असला तरी तो पुन्हा व्हायरल होत आहे. वाघाच्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हिडिओ पहा:-

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, जंगलाला लागून असलेल्या रस्त्यावर दोन-तीन गाड्या थांबल्या आहेत. एक महिला गाडीतून खाली उतरते, पण तेवढ्यात जंगलातून वाघ येतो आणि तिच्यावर हल्ला करतो. यानंतर वाघ महिलेला ओढून जंगलात घेऊन जातो. वाघाच्या हल्ल्यानंतर कारमधील इतर लोक महिलेला वाचवण्यासाठी धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर animals_powers नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 27 सेकंदांच्या या क्लिपला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपापल्या कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ही घटना चीनची आहे. आणखी एका युजरने लिहिले की, माणूस त्याच्या मूर्खपणामुळे मृत्यू ओढावून घेतो. आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, जंगलातून जाताना गाडीतून खाली उतरण्याची काय गरज होती. 

Web Title: Video: Woman attacked by tiger, he took her into jungle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.