Video: मेट्रोमध्ये 2 महिला भिडल्या, एकमेकींच्या जीवावर उठल्या; डोळ्यांवर मारला पेपर स्प्रे अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 05:15 PM2023-04-05T17:15:21+5:302023-04-05T17:20:26+5:30

दिल्ली मेट्रोमध्ये झालेलं महिलांचं एक भांडण सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Video woman attacks co passenger with pepper spray in delhi metro | Video: मेट्रोमध्ये 2 महिला भिडल्या, एकमेकींच्या जीवावर उठल्या; डोळ्यांवर मारला पेपर स्प्रे अन्...

Video: मेट्रोमध्ये 2 महिला भिडल्या, एकमेकींच्या जीवावर उठल्या; डोळ्यांवर मारला पेपर स्प्रे अन्...

googlenewsNext

सध्या दिल्ली मेट्रो सोशल मीडियावर खूप वेगाने ट्रेंड करत आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर अनेकदा भांडण होताना आपण पाहिलं आहे. पण आता दिल्ली मेट्रोमध्ये झालेलं महिलांचं एक भांडण सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मेट्रोमध्ये 2 महिला एकमेकींना भिडल्या. त्यानंतर एकीने दुसरीच्या डोळ्यांवर पेपर स्प्रे मारल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. 

हा व्हिडीओ थोडा जुना आहे, पण सोशल मीडियावर अलीकडेच #Delhimetro ट्रेंड झाल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सहसा महिला त्यांच्या सुरक्षिततेसाठी पेपर स्प्रे घेऊन घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत, दिल्ली मेट्रोमध्ये दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणात एका महिलेला पेपर स्प्रे वापरताना पाहून युजर्स खूपच हैराण झाले आहेत. 

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला दिल्ली मेट्रोमध्ये एका सीटसाठी भांडताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, सुमारे 3 हजार युजर्सनी व्हिडीओ लाईक केला आहे. 

व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचवेळी एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'भारत नवा होत आहे, कोणीही स्वत:ला कोणापेक्षा कमी समजत नाही, याचाच परिणाम आहे.' दुसर्‍याने टिप्पणी केली, 'दिल्ली मेट्रोमध्ये हे सामान्य आहे, अगदी डीएमआरसीला माहीत आहे की ते सामान्य आणि कायदेशीर आहे.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Video woman attacks co passenger with pepper spray in delhi metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.