Video - "नवरा आणि बॉयफ्रेंडसोबत एकाच घरात राहायचंय"; 3 मुलांची आई विजेच्या खांबावर चढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 12:36 PM2024-04-04T12:36:35+5:302024-04-04T12:43:38+5:30
विवाहित महिलेचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचललं. ती थेट विजेच्या खांबावर चढल्याची धक्कादायक घटना घडली.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. विवाहित महिलेचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचललं. ती थेट विजेच्या खांबावर चढल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेला तीन मुलं असून तिचे गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही बाब तिच्या पतीला समजताच त्याने तिला विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर महिला त्याला आत्महत्येची धमकी देऊ लागली.
फ्री प्रेस जर्नलने स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार म्हटलं आहे की, शेजारच्या गावातील एका तरुणासोबतचे महिलेचे प्रेमसंबंध तिच्या पतीने नाकारल्यानंतर महिलेने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. महिनाभरापूर्वी तिने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यापूर्वीही महिलेने रेल्वे रुळ गाठून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. महिलेला नवरा आणि बॉयफ्रेंड या दोघांसोबत एकाच घरात राहायचं आहे.
मोहब्बत का ऐसा सिला...', 3 बच्चों की मां को चढ़ा 'इश्क का बुखार',
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) April 3, 2024
प्रेमी को साथ रखने की बात पर पति से नाराज, खंभे पर चढ़ करने लगी तांडव !!#यूपी के #गोरखपुर से एक हैरान कर देने वाला मामला सामने आया है। यहां तीन बच्चो की माँ को प्यार का खुमार चढ़ा है और प्यार का खुमार भी इस कदर… pic.twitter.com/J6XQ4FMxRh
महिला विजेच्या खांबावर चढताना दिसली. या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला खांबावरून खाली उतरण्यास नकार देत आहे, तर स्थानिक लोक तिला समजावून पुन्हा खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. वृत्तानुसार, पोलीस पती, पत्नी आणि प्रियकर यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
पतीने आपल्या पत्नीबद्दल पोलिसांना माहिती दिली आणि सांगितलं की, पत्नीला प्रियकरासोबत राहायचं आहे, परंतु कौटुंबिक कारणांमुळे पत्नीला सोडू इच्छित नाही, कारण ती तीन मुलांची आई आहे. तीन मुलांची आई एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि आता ती प्रियकराला देखील त्याच घरात ठेवण्याचा हट्ट करत आहे. पतीने नकार दिल्याने ती संतापली आणि विजेच्या खांबावर चढली, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.