वर्क फ्रॉम होम : चुकून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा कॅमेरा सुरु राहिला अन् ती बाथरूममध्ये गेली...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 04:04 PM2020-04-02T16:04:41+5:302020-04-02T16:28:09+5:30
अनेक लाजिरवाणे अनुभव तुम्हाला घरून काम करताना आले असतील. पण PoorJannifer सारखा सगळ्यात वेगळा अनुभव नक्कीच कुणाला आला नसेल.
लॉकडाऊनमुळे जगभरातील अनेक लोक घरातून काम करत आहेत. पण वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट किती ओव्हररेडेट आहे हे आता सर्वांना हळूहळू कळून येत आहे. घरून काम करताना कधी तुमची मुलंच मधे येतात, आईच जोरात आवाज देते तर कधी तुमचा भाऊ मोठ्या आवाजात तुमचा अपमान करत असतो आणि ऑनलाइन मीटिंगला असलेले तुमचे सहकारी ते सगळं ऐकत आणि बघत असतात.
असे अनेक लाजिरवाणे अनुभव तुम्हाला घरून काम करताना आले असतील. पण PoorJannifer सारखा सगळ्यात वेगळा अनुभव नक्कीच कुणाला आला नसेल. #poorJennifer ही सध्या ऑनलाइन ट्रेन्ड होतीये. तेही एका चुकीच्या कारणासाठी.
अमेरिकेतील काही कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात तूफान व्हायरल झाला आहे. PoorJennifer ही तिच्या सहकाऱ्यांसोबत ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये होती. ती घरून काम करत होती. तिचा सहकारी कामाबाबत बोलत असताना ती घरातून चालतान दिसते.
तो बोलत असताना जेनिफर वॉशरूममध्ये पोहोचते एकाएकी पॅंन्ट काढून टॉयलेट सीटवर बसते. यावेळी ती लॅपटॉप बाजूला ठेवते पण ती त्यात दिसत असते. ती कॅंमेरात दिसत आहे हे तिच्या लक्षात येत नाही आणि ती लगेच सीटवर बसते. आता तिला तिचे सगळे सहकारी बघू शकत होते.
काही सेकंदांनी तिच्याच हा सगळा गोंधळ लक्षात येतो आणि ती कॅमेरा लगेच बंद करते. तिचे सगळे सहकारी हसू लागतात आणि सर्वांनाच याचा धक्का बसतो.
या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक म्हणतात की, हा व्हिडीओ फेक आहे. पण इतकं मात्र नक्की की, घरून काम करताना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो हे जेनिफरच्या उदाहरणावरून कळून येतं.