VIDEO : 13व्या मजल्यावरून खाली पडूनही महिला सुरक्षित, घटनेचा व्हिडिओ पाहून लोक अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 14:41 IST2024-07-26T14:40:54+5:302024-07-26T14:41:39+5:30
Viral Video : हैराण करणारी बाब म्हणजे इतक्या वरून खाली पडून तिला सामान्य इजा झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO : 13व्या मजल्यावरून खाली पडूनही महिला सुरक्षित, घटनेचा व्हिडिओ पाहून लोक अवाक्...
Viral Video : इमारतीवरून खाली लोक पडण्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. यात काही लोकांचा जीव जातो तर काही लोक आश्चर्यकारकपणे बचावतात. अशीच एक घटना रशियामधून समोर आली आहे. रशियाच्या नोवोसिबिर्स्कमध्ये एक 22 वर्षीय महिला 18 जुलै रोजी 13व्या मजल्याच्या खिडकीमधून खाली पडली. हैराण करणारी बाब म्हणजे इतक्या वरून खाली पडून तिला सामान्य इजा झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, 'रशियामध्ये 22 वर्षीय एक तरूणी 13व्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा जीव वाचला'. एका रिपोर्टनुसार, तरूणीला सामान्य इजा झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
A 22 year old girl fell from the 13th floor (about 130 feet) in Novosibirsk, Russia. She only had minor lung bruises thanks to damp grass cushioning her fall and went home the same day with no broken bones.
— Tom Valentino (@TomValentinoo) July 20, 2024
pic.twitter.com/mHBPWI2xT1
व्हिडीओ बघून एका यूजरने लिहिलं की, "मला वाटतं ती खाली पडत असताना देवाने आपला मूड बदलला असेल किंवा ती एखादी एलिअन असेल'. दुसऱ्याने लिहिलं की, 'मला संशय आहे की, खाली गवताचं लॉन आहे की जेलीचा बेड'. तिसऱ्याने लिहिलं की, 'हे बघून मला फारच आश्चर्य वाटलं. हे तिचं नशीब आहे की देवाची कृपा ती जिवंत आहेत'.