VIDEO : भर रस्त्यात बाइकच्या चाकामध्ये अडकला होता महिलेचा दुपट्टा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:22 PM2024-08-26T13:22:01+5:302024-08-26T13:40:01+5:30

VIDEO : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यातून आपल्याला ही शिकवण मिळते की, बाइक चालवताना काय काळजी घेतली पाहिजे. 

VIDEO : Woman scarf gets caught in bike passer by comes to her rescue | VIDEO : भर रस्त्यात बाइकच्या चाकामध्ये अडकला होता महिलेचा दुपट्टा आणि मग...

VIDEO : भर रस्त्यात बाइकच्या चाकामध्ये अडकला होता महिलेचा दुपट्टा आणि मग...

VIDEO : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात जे बघून लोक हैराण होतात. काही व्हिडीओ हसू फुलवतात तर काही व्हिडीओ इमोशनल करतात. तर काही व्हिडीओ असे असतात जे आपल्याला खूप काही शिकवून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यातून आपल्याला ही शिकवण मिळते की, बाइक चालवताना काय काळजी घेतली पाहिजे. 

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून सुनीता मनोहर मोरे नावाच्या महिलेसोबत एक दुर्घटना घडली होती. बाइक चालवत असताना महिलेच्या गळ्यातील दुपट्टा बाइकच्या मागच्या चाकामध्ये अडकतो. अशात दुपट्ट्यामुळे तिची मानही खाली खेचली जाते. अशात ती चपळता दाखवत बाइक लगेच थांबवते. लोकांची गर्दी जमा होते. एक व्यक्ती महिलेच्या मदतीला समोर येते. या दुर्घटनेत महिलेच्या मानेला सामान्य इजा झाली आहे. पण अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिला धक्का बसला आहे. 

महिलेने इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर करून तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. सोबतच हेही समजावून सांगितलं की, बाइक चालवताना सैल किंवा लांब कपडे टाळले पाहिजे. महिला एक ट्रॅव्हलर असून इन्स्टावर नेहमीच व्हिडीओ शेअर करत असते.

इन्स्टावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी मत व्यक्त केलं की, हा व्हिडीओ अनेक महिलांसाठी शिकवणं ठरेल ज्या बाइक किंवा स्कूटी चालवतात. तर एका व्यक्तीने मदतीसाठी समोर आलेल्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. तसेच अनेकांनी सल्ला दिला आहे की, बाइक किंवा स्कूटी चालवताना महिलांना दुपट्टे किंवा साडी सांभाळली पाहिजे. जेणेकरून ते चाकामध्ये अडकू नये.
 

Web Title: VIDEO : Woman scarf gets caught in bike passer by comes to her rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.