Video : फादर म्हणाले, 'लठ्ठ मुली स्वर्गात जात नाही' हे ऐकून एक मुलगी भडकली आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 12:30 PM2019-07-20T12:30:35+5:302019-07-20T12:31:20+5:30
लठ्ठ महिलेबाबत केलेलं एक विधान फादरना चांगलंच महागात पडलं असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लठ्ठ लोक हे नेहमीच अनेकांच्या गंमतीचा विषय ठरत असतात. त्यांना जेव्हा चान्स मिळेल तेव्हा लठ्ठपणावरून चिडवलं जातं. त्यांना नको नको ते बोललं जातं. पण असंच लठ्ठ महिलांवरील एक भाष्य एका फादरला चांगलंच महागात पडलं. Marcelo Rossi हे ब्राझीलचे एक प्रसिद्ध फादर आहेत. ते एका कार्यक्रमात भाषण करत होते, यावेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं.
She shoved him because he said fat women won’t go to heaven 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭pic.twitter.com/lkL4qwplic
— 🇸🇴 (@zemunna) July 18, 2019
ते आपल्या भाषणात म्हणाले की, 'लठ्ठ मुली स्वर्गात जात नाहीत'. झालं त्यांचं हे वादग्रस्त विधान त्यांना चांगलं भोवलं. झालं असं की, ते स्टेजवर भाषण देत असताना एक लठ्ठ मुलगी स्टेजवर आली आणि तिने फादरला मागून जोरदार धक्का दिला. फादर थेट स्टेजखाली जाऊन पडले.
A person who does not knows his future... how can he judge others future...
— Kavita (@KMahajan10) July 19, 2019
She is a hero ❤️😍😍
— Unnati Madan (@unnati_madan) July 19, 2019
Did he reach heaven safely??
— Aleisha64 علیشا (@Aleisha641) July 19, 2019
ही घटना ब्राझिलच्या पाउलोमधील असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. असे सांगितले जात आहे की, यावेळी कार्यक्रमाला जवळपास ५० हजार लोक उपस्थित होते. ते खाली पडल्यावर सर्वांनाच धक्का बसला. पण काही वेळाने ते उठले आणि ठीक असल्याने त्यांनी सांगितले. यात सगळ्यात सोशल मीडियातून फादरला धक्का देणाऱ्या मुलीचं कौतुक होत आहे.