बस ड्रायव्हरला महिलेने सर्वांसमोर केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 08:28 PM2022-02-11T20:28:57+5:302022-02-11T20:33:24+5:30
social viral : ही घटना आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला बस ड्रायव्हरला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका स्थानिक पत्रकाराने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. दरम्यान, ही घटना आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एक महिला राँग साइडने जात असताना सरकारी बसने तिच्या स्कूटीला धडक दिली. या धडकेत महिलेल्या स्कूटीचे नुकसान झाले. त्यामुळे आपल्या स्कूटीची अशी अवस्था पाहून ती महिला संतापली. ती बसमध्ये चढली आणि थेट ड्रायव्हरची कॉलर पकडून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागली.
ड्रायव्हरला बेदम मारहाण
महिलेने ड्रायव्हरच्या शर्टाची कॉलर वेगाने ओढली. त्यावेळी ड्रायव्हरच्या शर्टाची सर्व बटणेही तुटली. महिलेला ड्रायव्हरला बाहेर ओढायचे होते, पण ड्रायव्हर स्वतःचा बचाव करत होता. यावेळी महिलेने बसमध्येच ड्रायव्हरला बेदम मारहाण केली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. जेव्हा हा व्हिडिओ विजयवाडा पोलिसांपर्यंत पोहोचला, तेव्हा पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
अशाप्रकारे मारहाण करणे चुकीचे
हा व्हिडिओ रिट्विट करत आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी म्हटले आहे की, एका महिलेने ड्रायव्हरला मारहाण करणे चुकीचे आहे, हे निंदनीय आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. विजयवाडा शहर पोलिसांनी योग्य गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात बस ड्रायव्हरची चूक असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
महिला द्वारा ड्राइवर से मार-पीट करना बिलकुल गलत है, निंदनीय है. किसी को कानून हाथ में लेने का हक नहीं.@VjaCityPolice ने केस दर्ज कर सही किया.
साथ ही मामले यदि ड्राइवर की भी गलती हो, तो उसकी जांच कर उचित कार्यवाही होनी चाहिए. https://t.co/4IxuA0xuB2— Dipanshu Kabra (@ipskabra) February 10, 2022