Village jugaad : विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांचा भन्नाट जुगाड; पाहा जबरदस्त व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:37 PM2021-05-06T16:37:32+5:302021-05-06T17:03:21+5:30
Village jugaad : बर्याच वेळा जुगाडमुळे अशक्य कामही शक्य होतात. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय जुगाडाचे व्हिडिओ बर्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. लोकांना हे व्हिडिओ खूप आवडतात. आपल्या देशातील लोक प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा जुगाड करून आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि बहुतेक लोकांना या प्रयत्नांमुळे त्यांच्या कामात यश देखील मिळते.
बर्याच वेळा जुगाडमुळे अशक्य कामही शक्य होतात. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस आपल्या जुगाडच्या माध्यमातून विहिरीतून पाणी काढत आहे, लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत.
The value of water. Look how physics is applied in such an easy way. Try explaining the mechanism. Somewhere in Rajasthan. @pritambhurtiyapic.twitter.com/oEpulhRP6c
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) May 4, 2021
हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी प्रवीण कसवान यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये खेड्यातील एका व्यक्तीने विहिरीतून पाणी काढण्यासाठी भौतिकशास्त्राचा वापर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पाण्याची किंमत ... भौतिकशास्त्र कसे सोपे वापरले गेले ते पहा. यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न करा. राजस्थानात ही जागा आहे ... ' बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एखादी व्यक्ती विहिरीजवळ उभी आहे. विहिरीपासून काही अंतरावर दोन दांडयांना खूप मोठे लाकूड बांधलेले आहे. विहिरीजवळील दोरीला लाकडी टोकाला बांधलेले असते, ज्यामध्ये ती व्यक्ती बादली बांधून विहीरीत ठेवते आणि मग दोरी सहज खेचून पाणी काढून टाकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर 30 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत आणि काहीजण व्हिडिओवर बर्याच कमेंट्स देत आहेत. 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल व्हिडीओ