बापरे! पैसै जमा करण्यासाठी बँकेत गेला, स्लिपवर असं काही लिहिलं की बँकेतले अधिकारी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:27 PM2022-11-16T13:27:34+5:302022-11-16T13:50:10+5:30

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एका बँकेतील डिपॉझिट स्लिप व्हायरल झाली आहे.

viral account holder went to bank to deposit money wrote tula rashi in place of amount | बापरे! पैसै जमा करण्यासाठी बँकेत गेला, स्लिपवर असं काही लिहिलं की बँकेतले अधिकारी चक्रावले

बापरे! पैसै जमा करण्यासाठी बँकेत गेला, स्लिपवर असं काही लिहिलं की बँकेतले अधिकारी चक्रावले

googlenewsNext

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एका बँकेतील डिपॉझिट स्लिप व्हायरल झाली आहे. ही स्लिप पाहून अनेकजण चक्रावले आहेत. एका ग्राहकाने पैसे जमा करण्याची स्लिप भन्नाट भरली आहे, त्यातील मजकूर चांगलाच व्हायरल झालाय. 

बँकेच्या या डिपॉझिट स्लिपमध्ये खातेदाराने रोख ठेव करण्यासाठी आपली सर्व माहिती लिहिली आहे. पण 'राशी'च्या कॉलममध्ये त्याने रकमेऐवजी जे लिहिले आहे ते वाचून लोकांना हसू आवरता येत नाही. 

आपलं काम करा, पगार घ्या अन् थेट घरी जा..."; IAS Officer ची 'ही' पोस्ट तुफान व्हायरल

हा फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आहे, @NationFirst78 या ट्विटर वापरकर्त्याने १६ एप्रिल रोजी हा फोटो शेअर केला आहे. "लोक किती आश्चर्यकारक आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिले की, हे लोक येतात कुठून? असे दिसते की तूळ राशीचे लोक असे पराक्रम करत राहतात? तुम्ही कधी अशी चूक केली आहे का? मला टिप्पण्यांमध्ये सांगा, अशी कॅप्शन या ट्विटला दिली आहे. 

ही स्लिप इंडियन बँके मुरादाबाद येथील शाखेची आहे. एका ग्राहक त्याच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आला होता. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी त्यांना स्लिप भरण्यासाठी दिली. यावेळी त्या ग्राहकाने स्लिपमध्ये सर्व माहिती अचूक लिहून त्यांनी रकमेच्या रकान्यात 'तुळ' असे लिहिले. कारण रक्कम हिंदीत राशी असे लिहिले होते, यावर त्यांनी आपला रास लिहिली आहे. स्लिपवर बँकेचा शिक्का सोबत 12 एप्रिल ही तारीखही आहे, ज्यामुळे ही चूक होऊनही बँकेच्या अधिकाऱ्यांनी खातेदाराचे पैसे जमा केल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

Web Title: viral account holder went to bank to deposit money wrote tula rashi in place of amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.