४ कानांची मांजर पाहून अवाक् झाले लोक, नवं घर मिळाल्याने सोशल मीडियावर आनंदाची लहर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:20 PM2021-11-16T14:20:08+5:302021-11-16T14:22:13+5:30

Cat with 4 ears : रशियातील या अनोख्या मांजरीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या मांजरीला एक दोन नाही तर तब्बल चार कान आहेत.

Viral : Cat with 4 ears born in Turkey adopted by Turkish woman viral cat | ४ कानांची मांजर पाहून अवाक् झाले लोक, नवं घर मिळाल्याने सोशल मीडियावर आनंदाची लहर

४ कानांची मांजर पाहून अवाक् झाले लोक, नवं घर मिळाल्याने सोशल मीडियावर आनंदाची लहर

googlenewsNext

सोशल मीडियावर प्राण्यांचे आश्चर्यचकित करणारे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एका गायीने दोन तोंड असलेल्या वासराला जन्म दिला होता. तर त्याआधी पांच शिंगे असलेल्या बकरीची चर्चा रंगली होती. निसर्गाकडून काही वेगळं तयार केलं गेलं तर लोक नेहमीच हैराण होतात. आता सोशल मीडियावर एका मांजरीची (Cat with 4 ears) चर्चा रंगली आहे. कारण या मांजरीला चार कानं आहेत.

रशियातील या अनोख्या मांजरीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या मांजरीला एक दोन नाही तर तब्बल चार कान आहेत. तिच्या कानामुळे ती वेगळी ठरत आहे आणि त्यामुळेची तिची चर्चा होत आहे. ४ महिन्यांच्या या मांजरीचं नाव मिडास आहे  आणि तिचं इन्स्टाग्राम पेजही आहे. ज्यावर तिचे ४६ हजार फॉलोअर्सही आहेत. या मांजरीचे कानच हैराण करणारे नाही तर तिच्या छातीवर पांढऱ्या रंगाचा बर्थ मार्क आहे. ज्याचा आकार हृदयासारखा आहे.

नुकतंच एका महिलेने या मांजरीला पाळलं आहे. ज्यानंतर तिने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. तुर्कीत राहणाऱ्या कॅनिस डोसेमेसी या महिलेने आणि तिच्या पार्टनरने रशियातील या चार कान असलेल्या मांजरीला दत्तक घेतलं आहे.

मांजरीच्या इन्स्टाग्रामवरून समजतं की, कॅनिस आधीपासूनच प्राण्यांवर प्रेम करते आणि मिडासला घरी आणण्याआधी तिच्याकडे १२ वर्षाचा एक डॉगीही आहे. मिडास आणि सूजी यांचं चांगलं पटत आहे. दोघांचे सोबत खेळतानाचे अनेक फोटो आहेत. एका व्हिडीओत तर मांजरी सूजीला गुडनाइट किस देतानाही दिसत आहे. 
 

Web Title: Viral : Cat with 4 ears born in Turkey adopted by Turkish woman viral cat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.