न रडल्यास १०० रुपये, नियम पाळल्यास बोनस; सहा वर्षांच्या मुलाचा वडिलांसोबत करार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:30 AM2022-05-02T11:30:45+5:302022-05-02T11:35:54+5:30
स्वाक्षरीही घेतली, सोशल मीडियावर व्हायरल होतोय चिमुकल्याचं गंमतीशीर करारपत्र
नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या मुलाशी किंवा तुमच्या आई-वडिलांशी कधी करार केला आहे? नसेल तर हा करार एकदा वाचून घ्याच.. त्यातल्या अटी, नियम आणि गोष्टी वाचून हैराण व्हाल. सहा वर्षांच्या चिमुकल्याशी झालेला हा करार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे त्यावर पालक आणि मुलाचीही स्वाक्षरी आहे.
हे वेळापत्रक नेमके कोणी पोस्ट केले हे कळू शकलेले नाही. सर्वच पालकांना मुलाच्या भवितव्याबद्दल चिंता असते, त्याला चांगल्या सवयी लागाव्या यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात. त्यामुळेच हे प्रकरण नेमके काय आहे, या उत्सुकतेपोटी हा करार सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.
करार सोशल मीडियात व्हायरल
‘मी आणि माझ्या सहा वर्षांच्या मुलाने त्याच्या दैनंदिन वेळापत्रकासाठी व कार्यप्रदर्शनाशी संलग्न बोनससाठी आज स्वाक्षरी केली आणि करार केला,’ अशा आशयाच्या मजेशीर कॅप्शनसह हे टाइम-टेबल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
- अलार्मची वेळ सकाळी ७.५० व अंथरुणातून बाहेर येण्याची वेळ ८.०० पर्यंत
- किती वाजता उठायचे, नाश्ता, अंघोळ याच्या वेळा ठरलेल्या, अभ्यास किती वेळ आणि झोपण्याची वेळ निश्चित
Me and my 6 year old signed and agreement today for his daily schedule and performance linked bonus 😂 pic.twitter.com/b4VBKTl8gh
— Batla_G (@Batla_G) February 1, 2022
न रडल्यास बक्षीस!
वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करून न रडता, न किंचाळता, न भांडण करता एक दिवस घालविल्यास १० रुपयांचं बक्षीस.
सलग ७ दिवस याचं पालन केल्यास रुटीनमध्ये १०० रुपयांचे बक्षीसदेखील ठेवण्यात आले आहे.
ब्रश, नाश्ता, साफसफाई, टीव्ही पाहणे, फळे खाणे, खेळणे, दूध पिणे, टेनिस खेळणे, गृहपाठ करणे, रात्रीचे जेवण, झोपण्याची वेळ, इत्यादींबाबतही वेळ ठरलेली आहे.