Video: धन्य ते मुंबईचे रस्ते.... स्पीड ब्रेकरवर अडकली आलिशान जग्वार कार.. अखेर सामान्य मुंबईकरच आले मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 05:12 PM2023-03-01T17:12:19+5:302023-03-01T17:13:54+5:30
मुंबईच्या रस्त्यावर जग्वार कारला मारावा लागला धक्का... व्हिडीओ व्हायरल
Car stuck on Speed breaker of Mumbai Rods, Viral Funny Video: वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरचा वापर केला जातो. पण हल्ली काही ठिकाणी रस्त्यावर असे स्पीड ब्रेकर दिसतात, जे वेग कमी करण्याऐवजी वाहनांचे नुकसान करतात. काही वेळा काही 'धोकादायक स्पीड ब्रेकर'मुळे अपघातही होतात. अशीच एक ताजी घटना मुंबईची आहे. मुंबईतील एका भागात रस्त्यावर असे स्पीड ब्रेकर बनवण्यात आले होते की त्यावर जग्वार कंपनीची आलिशान कारच अडकली. रस्त्यावर कार विचित्रपणे अडकल्याने ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होऊ लागली. अशा स्थितीत चालकाला मदत करण्यासाठी अखेर मुंबईकरांनी जोर लावला आणि सगळ्यांनी कारला धक्का दिल्याने जग्वार कार स्पीड ब्रेकरवरून पुढे गेली.
हा व्हिडिओ २७ फेब्रुवारी म्हणजे दोन दिवसांपूर्वीच @RoadsOfMumbai या ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - लोक मुंबईत लक्झरी वाहने का खरेदी करतात? त्यासोबत त्याने या घटनेबाबतही स्पष्ट शब्दांत सांगितले. त्याने पोस्ट केलेल्या या क्लिपला आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि भरपूर लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी विचारले की आर्थिक राजधानीत चांगले रस्ते का नाहीत? दरम्यान हा व्हिडिओ मूळतः इंस्टाग्राम युजर 'सिड शर्मा' (simplysid08) ने पोस्ट केला, तो इंटरनेटवर एक ट्रेंडिंग विषय बनला. पाहा तो व्हिडीओ-
हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणाले की, भारतातील रस्ते आलिशान वाहनांसाठी केव्हा सुयोग्य होतील माहिती नाही. तर काही युजर्सनी सांगितले की, त्यांच्या परिसरातही असे स्पीड ब्रेकर आहेत, ज्यामुळे त्यांच्या वाहनाचे अनेक वेळा नुकसान होते. एका व्यक्तीने सांगितले की, दुबईचे रस्ते लक्झरी कारसाठी सर्वोत्तम आहेत. त्याचप्रमाणे अनेकांना, कार अडकल्यावर लोक मदतीसाठी एकत्र आले हे पाहून खूप आनंद झाला, हेच मुंबईकरांचे स्पिरीट आहे असे अनेकांनी लिहिले.