...म्हणे नरकाचा दरवाजा! गुगल मॅपवर सापडलं रहस्यमय दार; हा रस्ता जातो तरी कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 21:08 IST2021-10-02T21:05:45+5:302021-10-02T21:08:55+5:30
गुगल मॅपवर सापडला रहस्यमयी दरवाज्याचा फोटो; तर्कवितर्कांना उधाण

...म्हणे नरकाचा दरवाजा! गुगल मॅपवर सापडलं रहस्यमय दार; हा रस्ता जातो तरी कुठे?
अंकारा: सर्वसामान्यपणे गुगल मॅप्सचा वापर एखादं ठिकाण शोधण्यासाठी होतो. एखाद्या ठिकाणी जायचं असल्यास तिथे पोहोचण्यासाठी आपण अनेकदा गुगल मॅप्सचा आधार घेतो. पण एका व्यक्तीनं गुगल मॅप्सवरून एक वेगळीच गोष्ट शोधून काढली आहे. आता ही वास्तू नेमकी काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका व्यक्तीनं तुर्कस्तानातल्या डोंगराळ भागांत एक दरवाजा शोधून काढला आहे. निर्मनुष्य जागेत असलेला हा रस्ता नेमका कुठे जातो, याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
एका व्यक्तीनं रेडिटवर एक फोटो अपलोड केला आहे. यामध्ये डोंगराळ भागात एक दरवाजा दिसून येत आहे. हा दरवाजा एकाच दगडात तयार करण्यात आला आहे. जमिनीखाली जाण्यासाठी या द्वाराचा उपयोग करण्यात येत असावा असं दिसत आहे. हा दरवाजा तुर्कस्तानातल्या बुरदूर आणि डेनिजलीमध्ये असल्याचा काहींचा दावा आहे.
काहींच्या म्हणण्यानुसार ही जागा कब्रस्तान किंवा मकबऱ्यासारखी असू शकते. काही मकबऱ्यांमध्ये प्रवेश करण्याचे दरवाजे अशा प्रकारचे असतात. तर काहींना हा नरकाचा दरवाजा वाटतो. काहींना हा दुसऱ्या जगात जाण्याचा दरवाजा वाटत आहे. मात्र अद्याप तरी ती ही वास्तू नेमकी काय आहे हे समजू शकलेलं नाही.