Fact Check : मोदी सरकार तब्बल 10 कोटी युजर्सना 3 महिने देणार मोफत इंटरनेट?; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 01:38 PM2021-04-06T13:38:46+5:302021-04-06T13:48:46+5:30

Fact Check : सोशल मीडियावर एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार पुढील 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सेवा (Free internet Service) देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

viral message on whatsapp will 10 crore people get free internet from central government check fact | Fact Check : मोदी सरकार तब्बल 10 कोटी युजर्सना 3 महिने देणार मोफत इंटरनेट?; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं 'सत्य'

Fact Check : मोदी सरकार तब्बल 10 कोटी युजर्सना 3 महिने देणार मोफत इंटरनेट?; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं 'सत्य'

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र याच दरम्यान अनेक मेसेज हे वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होणारे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार पुढील 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सेवा (Free internet Service) देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच एक लिंक देखील देण्यात आली आहे. सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी पुढील 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट सेवा देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

भारत सरकारद्वारा ऑनलाईन शिक्षणासाठी 10 कोटी युजर्सना 3 महिन्यांचा रिचार्ज प्लॅन फ्री देण्याचं सांगण्यात आलं आहे. जर तुमच्याकडे जिओ, एअरटेल किंवा वोडाफोन-आयडियाचं सिम असेल, तर युजर्स या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. मला फ्री रिचार्ज मिळाला असून तुम्हीही ही ऑफर मिळवू शकता असं या मेसेजमध्ये लिहिलं आहे. सोशल मीडियावर हा मसेज तुफान व्हायरल होत आहे. या मेसेजखाली एक लिंकही देण्यात आली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करुन रिचार्ज मिळवता येईल असं सांगण्यात आलं आहे. तसंच ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, असंही त्या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला हा व्हायरल मेसेज पूर्णपणे फेक असल्याची आता माहिती मिळत आहे. PIB ने हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही घोषणा केली गेलेली नाही. #FraudAlert एका #WhatsApp मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, भारत सरकार 3 महिन्यांसाठी 100 मिलियन युजर्सला मोफत इंटरनेट देत आहे. परंतु हा दावा खोटा असून सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारची अशी कोणतीही स्किम नाही, ज्यात 10 कोटी लोकाना मोफत 3 महिने इंटरनेट सर्व्हिस मिळेल असं पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

व्हायरल होणाऱ्या मेसेजसोबत दिलेल्या कोणत्याही लिंकवर अजिबात क्लिक करू नका. या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सची फसवणूक होण्याची शक्यता असून मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं असा सल्ला देखील युजर्सना देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही सोशल मीडियावर अफवा पसरवणारे अनेक मेसेज जोरदार व्हायरल झाले आहेत. पीआयबीने त्याबाबत वारंवार युजर्सना अलर्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

Web Title: viral message on whatsapp will 10 crore people get free internet from central government check fact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.