कडक सॅल्यूट! फक्त ४ तासात ६८ वर्षांच्या आजींनी चिमुरड्या नातवासह सर केला हरिहर गड
By manali.bagul | Published: October 11, 2020 11:37 AM2020-10-11T11:37:22+5:302020-10-11T11:42:02+5:30
Viral News Marathi : नाशिकमधल्या ६८ वर्षांच्या आजींनी सर करून दाखवला आहे. विशेष म्हणजे आजींसोबत, त्यांच्या नातवानेही हा अवघड गड सर केला.
इच्छा तेथे मार्ग हे वाक्य अनेकदा तुमच्या कानी पडलं असेल. ट्रेकिंग वैगैरेचं प्रमाण तरूण पीढीमध्ये सगळ्यात जास्त दिसून येतं. ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण समजला जाणारा नाशिकचा हरिहर गड, ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हाच गड नाशिकमधल्या ६८ वर्षांच्या आजींनी सर करून दाखवला आहे. विशेष म्हणजे आजींसोबत, त्यांच्या नातवानेही हा अवघड गड सर केला. हरिहर गड सर करणाऱ्या नाशिकच्या या आजींचे नाव आशा अंबाडे असून नातवाचे नाव मृगांश आंबाडे आहे.
समुद्रसपाटीपासून ३ हजार ६७६ फूट उंच असलेला हरिहर गड ८० अंशांच्या कोनात आहे. त्यामुळे हा त्रिकोणी गड सर करणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. सोशल मीडियावर कालपासून या आजींचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सनी या आजींच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आजींसह चिमुरड्यानेही किल्ला सर केल्यामुळे त्याचंही नेटिझन्स कौतुक करत आहेत.
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या अंबाडे कुटुंबातील सर्वांनाच ट्रेकिंगची आवड असल्यानं, घरातला प्रत्येक जण ट्रेकिंगला जातो. त्यातूनच यावेळी आशा अंबाडे आजींसोबत हरिहर गड सर करायचा निश्चय अंबाडे कुटुंबाने केला आणि तसे प्रयत्न सुरू झाले. आजींची इच्छाशक्ती आणि फिटनेस पाहता हा गड सहज सर करू शकतील असा विश्वास कुटुंबातील लोकांना होता. अखेर आजींनी किल्ला सर करूनच दाखवला. क्या बात! शाळेच्या आठवणींना उजाळा देत रतन टाटांनी शेअर केला 'जुना' फोटो, फॅन्स म्हणाले.....
आजींचा फिटनेस पाहून तरूणांसह वृद्धांनाही हूरुप येईल. 'हा किल्ला सर करताना मनात कोणतीही भीती नव्हती. किल्ला सर करत असताना स्वर्ग सुशाची प्राप्ती झाल्याचे', आजींनी सांगितले. याशिवाय पहिल्यांदाच उंच किल्ला सर करत असताना थकवाही जाणवला नाही असंही त्या म्हणाल्या. अरे व्वा! बाबा का ढाब्यावर खवय्यांची तुफान गर्दी, रडणाऱ्या चेहऱ्यावर फुललं हसू, पाहा व्हिडीओ