दही खाणारा माणूस; तीन मिनिटांत 'इतकं' दही खातात की सगळे पाहतच राहतात, रेकॉर्ड तोडणं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:49 PM2024-01-19T13:49:40+5:302024-01-19T13:52:16+5:30

एका व्यक्तीने दही खाण्याचा रेकॉर्ड केला आहे.

viral news A person make record eating curd | दही खाणारा माणूस; तीन मिनिटांत 'इतकं' दही खातात की सगळे पाहतच राहतात, रेकॉर्ड तोडणं कठीण

दही खाणारा माणूस; तीन मिनिटांत 'इतकं' दही खातात की सगळे पाहतच राहतात, रेकॉर्ड तोडणं कठीण

आपल्याकडे कधी कोण कशाचा रेकॉर्ड करेल सांगता येत नाही. पोहण्याचा, नृत्याचा असे अनेक रेकॉर्ड तुम्ही पाहिले असतील. पण, बिहारमधून एक अबजच विक्रम केल्याचे समोर आले आहे. बिहारमध्ये एका व्यक्तीने दही खाण्यात रेकॉर्ड केला आहे. दही खाण्याचा रेकॉर्ड करणारा व्यक्ती ६३ वर्षाचा आहे, पण या व्यक्तीने १८ वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं काम केले आहे. बिहारच्या ६३ वर्षीय प्रणय शंकर कांत यांनी ३ मिनिटांत ४ किलो ३४३ ग्रॅम दही खाण्याचा रेकॉर्ड केला आहे. दरम्यान, प्रणय कांत यांची चर्चा बिहारमध्ये जोरदार सुरू आहे. 

शिपाई महिलेच्या पतीला पळवून घेऊन गेली शिक्षिका, मदत म्हणून घरात दिली होती जागा

बिहारमध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संक्रांतीच्या पार्शवभूमीवर बिहारमधील एका डेअरीने दही खाण्याची स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेला "दही खाओ ईनाम पाओ" असं नाव दिले. या स्पर्धेत बिहारसह अन्य राज्यातील लोकांनीही सहभाग घेतला. या स्पर्धेत २०१६ पासून प्रणय कांत हेच विजयी होत आहेत, अजून पर्यंत त्यांनी विजय सोडलेला नाही. आजपर्यंत कोणीच त्यांच्यापेक्षा जास्त दही खावून दाखवलेलं नाही. 

प्रणय शंकर कांत हे २०१६ ते २०२४ पर्यंत सतत दहीसम्राट ही पदवी मिळवत आहेत. १८ जानेवारी रोजी झालेल्या स्पर्धेत प्रणय शंकर कांत यांनी पुरुष, महिला आणि वृद्ध गटात सर्वाधिक दही खाल्ल्यामुळे एकूणच विजेतेपद त्यांनी मिळविले. पण प्रणय कांत यांनी बोलताना स्वत:चाच विक्रम न मोडल्याचे दु:ख व्यक्त केले.

स्वत:चा रेकॉर्ड मोडता आला नाही

प्रणय कांत दही खाण्याच्या रेकॉर्डवर बोलताना म्हणाले,  यावेळी दही खाताना  काहीतरी गडबड झाली, यावर्षी मी स्वतःचा ४ किलो ३४३ ग्रॅम वजन दही खाण्याचा विक्रम मोडून नवा रेकॉर्ड करणार असे मला वाटले पण तसे झाले नाही. यावेळी मी दही खायला बसताना चूक केली नाहीतर मी ५ किलोपेक्षा जास्त दही खाल्ले असते, असंही कांत म्हणाले. प्रणय कांत हे ६३ वर्षाचे असुनही फिट आहेत. त्यांना कोणताही आजार नाही. मी दररोज १५ ते २० किलोमीटर चालतो, असंही कांत सांगतात. 

Web Title: viral news A person make record eating curd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.