काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 01:49 PM2024-10-01T13:49:01+5:302024-10-01T13:53:03+5:30

सोशल मीडियावर एक उत्पन्नाचा दाखला व्हायरल झाला आहे, या दाखल्यात फक्त २ रुपये उत्तन्न दाखवले आहे.

viral news annual income of this family is only 2 rupees, the certificate was given by the Tehsildar | काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला

काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला

आपल्याकडे अनेक शासकीय योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला महत्वाचा मानला जातो. उत्तन्नाचा दाखला आपल्याकडे तहसीलदार कार्यालयात मिळतो. यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. सध्या सोशल मीडियावर एक दाखला व्हायरल झाला आहे. या दाखल्यात एका कुटुंबाची वार्षिक उत्तन्न फक्त २ रुपये दाखवण्यात आले आहे. या दाखल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप

तहसीलदारांच्या स्वाक्षरीनंतर प्रमाणपत्र दिले जाते. प्रमाणपत्र जानेवारी २०२४ मध्ये तयार केले आहे. सोमवारी हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यामध्ये कौटुंबिक उत्पन्न फक्त २ रुपये दाखवण्यात आले आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशातील आहे. याबाबत मध्यप्रदेशातील  बांदा तहसीलदार महेंद्रसिंह चौहान म्हणाले, 'हे प्रकरण समोर आले आहे. हे माझ्या पोस्टिंगच्या आधीचे आहे. उत्पन्नाचा दाखला तपासणे. जर ते सुधारित केले नसेल तर ते दुरुस्त केले जाईल, असं त्यांनी सांगितले. 

हा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तपास करण्यात आला. हा उत्पन्नाचा दाखला बांदा ब्लॉकच्या घुगरा गावातील रहिवासी बलराम चधर यांचा असल्याचे समोर आल. त्यांनी जानेवारी महिन्यात अर्ज केला होता. त्यावेळी बलराम चधर यांनी वार्षिक उत्पन्न ४० हजार रुपये लिहिले होते, मात्र संबंधित केंद्रात ऑनलाइन अर्ज करताना उत्पन्न २ रुपये लिहिले होते.

ऑनलाइन अर्जात दोन रुपये उत्पन्न टाकल्यानंतर प्रमाणपत्र बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी लिपिकापासून ते तहसीलदारांपर्यंत अर्ज पोहोचले. त्यावेळी असलेल्या बांदा तहसीलदार ज्ञानचंद्र राय यांनी अर्जावर स्वाक्षरी करून ८ जानेवारी २०२४ रोजी प्रमाणपत्र जारी केले.

यावेळी तहसीलदारांनी अर्जदाराचे उत्पन्न फक्त दोन रुपये दाखवले असल्याचेही लक्षात घेतले नाही. याबाबत मी तत्कालीन बांदा तहसीलदार ग्यानचंद्र राय यांच्याशी बोललो त्यावेळी त्यांनी उत्तर न देता फोन कट केला.

Web Title: viral news annual income of this family is only 2 rupees, the certificate was given by the Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.