वरात आली, पुष्पहार आला, लग्नासाठी मंडळी मंडपात बसले, वधूला 'ही' वस्तू मिळाली नाही, नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 04:26 PM2023-02-27T16:26:13+5:302023-02-27T16:28:26+5:30
देशभरात लग्नाचा हंगाम सुरू आहे, आपल्याकडे लग्न जोरदार आणि उत्साहात केले जाते. लग्नात कोणत्याही गोष्टींची कमी पडू देत नाहीत, उत्तर प्रदेशमधील असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
देशभरात लग्नाचा हंगाम सुरू आहे, आपल्याकडे लग्न जोरदार आणि उत्साहात केले जाते. लग्नात कोणत्याही गोष्टींची कमी पडू देत नाहीत, उत्तर प्रदेशमधील असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेश येथील औरेया परिसरात एका लग्नाची तक्रार पोलिसात केली आहे.
फतेहपूर जिल्ह्यातील अबू नगर गावातील रहिवासी असलेल्या सौरभचे लग्न सदर कोतवाली भागातील जारुहोलिया गावातील ग्यानबाबू यांची मुलगी संगीता हिच्याशी ठरले होते. मुलाच्या बाजूचे लोक थाटामाटात जारुहोलिया गावात पोहोचले. येथील जयमाला कार्यक्रम आटोपल्यानंतर अर्धे लोक आपापल्या घरी परतले होते. मुलाच्या बाजूचे नातेवाईक लग्नसमारंभात थांबले होते, दरम्यान मुलाकडच्या लोकांनी कमी सोनं पाहून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी वराची बहीण प्रियांका वर्मा वधूला शांत करण्यासाठी आली तेव्हा वधू संगीताने तिच्यावर हल्ला केला.
दरम्यान, दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. हा वाद पाहूण बाजूचे वधूच्या बाजूचे लोक एकत्र झाले, त्यांनी वराच्या बाजूच्या नातेवाईकांना ओलीस ठेवले. दरम्यान, या संदर्भात कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
हजारो वर्षापूर्वी सुरू झाला फ्लश टॉयलेटचा वापर; 'या' देशात उत्खननात सापडले पुरावे
कोतवालीचे निरीक्षक रवी श्रीवास्तव यांनी दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून समज देण्याचा प्रयत्न केला. वराची बहीण प्रियंका वर्मा हिने पोलिसांना सांगितले की, मुलीच्या बाजूच्या लोकांनी तिला आणि इतर नातेवाईकांना सुमारे तीन तास ओलीस ठेवले. तसेच अश्लील कृत्य केले. सुमारे तीन तास हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर वधूने लग्नास नकार दिला. यानंतर दोन्ही बाजूना दिलेल्या वस्तु एकमेका काम होत नसल्याचे पाहून दोन्ही पक्षांनी एकमेकांना परत केल्या आणि मिरवणूक वधूशिवाय परतली.