काय सांगता! लॉटरीत १० हजार कोटी जिंकले, २ महिने झाले बक्षीस घेतले नाही अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 04:23 PM2022-09-27T16:23:43+5:302022-09-27T16:32:27+5:30
लॉटरी कधी कुणाला करोडपती बनवेल सांगता येत नाही. आपल्याकडे लॉटरी जिंकल्यानंतर आपण लगेचच बक्षीस स्विकारतो.पण अमेरिकेतून एक अशी घटना समोर आली आहे.
लॉटरी कधी कुणाला करोडपती बनवेल सांगता येत नाही. आपल्याकडे लॉटरी जिंकल्यानंतर आपण लगेचच बक्षीस स्विकारतो.पण अमेरिकेतून एक अशी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने १० हजार कोटींची लॉटरी जिंकली, पण गेली दोन महिने तो व्यक्ती बक्षीस घेण्यासाठी आलाच नसल्याचे समोर आले आहे. आता या लॉटरी संदर्भात दोघांनी दावा केलाय.
ही लॉटरी अमेरिकेच्या इतिहासातील तिसरी सर्वात मोठी लॉटरी आहे.आता लॉटरीचे बक्षीस दोघांना मिळणार असल्याची माहिती इलिनोइस लॉटरीने दिली. या लॉटरीचे एक तिकीट त्यांनी दोघात खरेदी केले होते, यावेळीच त्यांनी जिंकले तर बक्षीस दोघात वाटून घेण्याचे ठरवले होते.
ऑनलाइन सेलमध्ये मागवला लॅपटॉप, आला कपड्यांचा साबण; कंपनी म्हणाली, "काहीही करू शकत नाही"
या दोघांनी अगोदर ओळख लपवून ठेवण्याचे ठरवले होते. मिळणाऱ्या रक्कमचे काय करायचे ते हे दोन्ही विजेते अजुनही ठरवत आहेत. २९ जुलै रोजीच लॉटरीच्या विजेत्याची घोषणा झाली होती. हे तिकीट शिकागो जवळ प्लेन्स शहरातून खरेदी केले होते. पण लॉटरीची सोडत निघुनही कुणीही त्यावर दावा केला नव्हता. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली होती.
स्कूलबसच्या दरवाज्यात अडकली चिमुरडी; १ किलोमीटर फरफटत घेऊन गेला ड्रायव्हर, व्हिडिओ व्हायरल
लॉटरीचे निघाल्यानंतर ६० दिवसात विजेत्यांनी दावा करणे बंधनकारक असते. पण २ महिने झाले तरीही या दोघांनी दावा केला नव्हता. त्यांनी अर्थ तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यासाठी एवढे दिवस लावल्याचे बोलले जात आहे. ते एकाचवेळी ६३ अरब रुपये घेणार आहेत.त्यांनी जर हे पैसे हप्त्याने घेतले असते तर त्यांना १० हजार कोटी रुपये मिळाले असते. अमेरिकेत या दोन विजेत्यांची ओळख अजुनही उघड करण्यात आलेली नाही.