मस्तच! 1986 मध्ये बुलेट 350cc ची किंमत होती फक्त 'एवढी', बिल पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 05:07 PM2022-12-28T17:07:46+5:302022-12-28T17:09:08+5:30
बुलेट म्हणजे आताच्या काळातील प्रत्येकाच्या स्वप्नातील बाईक. प्रत्येकाला बुलेट खरेदी करुन त्यावर सवार होण्याची इच्छा असते, सध्या बुलेटचे दर लाखांमध्ये आहेत.
बुलेट म्हणजे आताच्या काळातील प्रत्येकाच्या स्वप्नातील बाईक. प्रत्येकाला बुलेट खरेदी करुन त्यावर सवार होण्याची इच्छा असते, सध्या बुलेटचे दर लाखांमध्ये आहेत. बुलेटची क्रेझ काही आताच आलेली नाही. आपल्या देशात पूर्वीपासूनच बुलेटची क्रेझ आहे. सध्या सोशल मीडियावर १९८६ चे बुलेटचे बिल व्हायरल झाले आहे. हे बिल पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. हे बिल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
आज 'राइड ऑफ प्राइड' म्हणून मानल्या जाणाऱ्या बुलेटची किंमत 1.24 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. पण एक काळ होता, जेव्हा बुलेटची किंमत 19 हजार रुपये होती. होय ही किंमत खरीच आहे, बुलेटचे 1986 चे एक बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बुलेट 350cc ची किंमत फक्त 18,700 रुपये आहे. सध्याच्या 'बुलेट 350 सीसी' बाईकची सुरुवातीची किंमत रु. 1.60 लाख रुपये आहे.
जवानांच्या शौर्याला सलाम; कमरेपर्यंत शरीर अडकलं बर्फात, तरीही खंड पडेना कर्तव्यात!
बिलाचा हा फोटो 13 डिसेंबर रोजी royalenfield_4567k या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. '1986 मध्ये रॉयल इन फील्ड 350cc, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे. या पोस्टला आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले, आता फक्त रिक्म एवढ्या किंमतीला मिळतात. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, माझी बाईक एका महिन्यात इतके तेल वापरते.
हे बिल 23 जानेवारी 1986 चे आहे, जे सध्या कोठारी मार्केट, हे बिल झारखंड येथे असलेल्या अधिकृत डीलरचे आहे. यावेळी 350 सीसी बुलेट मोटरसायकलची ऑन-रोड किंमत 18,800 रुपये होती, जी सूट मिळाल्यानंतर 18,700 रुपयांना विकली.
यापूर्वी सोशल मीडियावर असेच एक बिल व्हायरल झाले होते. हे बिल सायकलच्या बिलाचे आहे. एकेकाळी सायकल फक्त १८ रुपयांना मिळत होती. हे बिल ८८ वर्षे दुने बिल आहे. 12 ऑगस्ट 2013 रोजी लाझीज रेस्टॉरंट अँड हॉटेल या फेसबुक पेजने खाद्य बिलाचे फोटो शेअर केला आहे. यामध्ये शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटीचे दर लिहिले आहेत. त्यावेळी शाही पनीर अवघ्या आठ रुपयांना, दाल मखनी आणि रायता पाच रुपयांना मिळत होता. हे बिलही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.