भन्नाट! टॉयलेट सीटवर बसून बनवत होता जेवण, कारण समजल्यावर नेटकरीही गोंधळले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 07:32 PM2023-01-04T19:32:58+5:302023-01-04T19:38:35+5:30

आपण घरं खरेदी करत असाताना अनेक गोष्टींचा विचार करत असतो. यात किचन वेगळ्या ठिकाणी असावे, सुटसुटीत जागा असावी. बेडरुम वेगळी असावी, टॉयलेटही वेगळे असावे.

viral news cooking food while sitting on toilet seat in shanghai china | भन्नाट! टॉयलेट सीटवर बसून बनवत होता जेवण, कारण समजल्यावर नेटकरीही गोंधळले!

भन्नाट! टॉयलेट सीटवर बसून बनवत होता जेवण, कारण समजल्यावर नेटकरीही गोंधळले!

Next

आपण घरं खरेदी करत असाताना अनेक गोष्टींचा विचार करत असतो. यात किचन वेगळ्या ठिकाणी असावे, सुटसुटीत जागा असावी. बेडरुम वेगळी असावी, टॉयलेटही वेगळे असावे. पण एख घर वेगळ्याच पद्धतीचे समोर आले आहे. यात  टॉयलेट सीटवर बसून स्वयंपाक बनवत असल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

हा फोटो चीनच्या शांधाय शहरातील आहे.हा फोटो शांघायमधील एका मोठ्या वसाहतीमधील आहे, या फोटोत एक व्यक्ती टॉयलेट सीटवर बसून स्वयंपाक करत असल्याचे दिसत आहे.

Video: अरबाजसोबत हॉट लूकमध्ये दिसली मलायका; मात्र माध्यमांसमोर तिने केलेल्या कृतीची रंगली चर्चा

पण, या फोटोचे सत्य काही वेगळेच होते. ती व्यक्ती टॉयलेट सीटवर बसली आहे, आणि स्वयंपाक करत आहे. पण हा फोटो जाहिरातीमधील आहे. शांघायमधील एका रिअल इस्टेट कंपनीने नुकतीच ही जाहिरात सुरू केली आहे. एवढे छोटे घर बांधूनही तुम्हाला संबंधित स्थावर मालमत्ता दिली जाईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न या जाहिरातीत करण्यात आला आहे.

चीनमधील शांघाय सारख्या शहरात जमिनीची इतकी कमतरता आहे, लोकसंख्या इतकी जास्त आहे की लोक लहान घरात राहतात. रिअल इस्टेटचा दावा आहे की यामुळे तुम्हाला कमीत कमी जागेत संपूर्ण घराची सोय मिळेल. सोशल मीडियावर या फोटोवर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: viral news cooking food while sitting on toilet seat in shanghai china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.