Video : दिल्ली मेट्रोत हे काय सुरूये, बिकिनी गर्लनंतर आता कपलचा किसिंग व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 03:30 PM2023-04-08T15:30:57+5:302023-04-08T15:32:42+5:30

गेल्या काही दिवसापूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एका तरुणीने बिकिनीमध्ये प्रवास केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.

viral news delhi metro new video couple kissing | Video : दिल्ली मेट्रोत हे काय सुरूये, बिकिनी गर्लनंतर आता कपलचा किसिंग व्हिडीओ व्हायरल

Video : दिल्ली मेट्रोत हे काय सुरूये, बिकिनी गर्लनंतर आता कपलचा किसिंग व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

गेल्या काही दिवसापूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एका तरुणीने बिकिनीमध्ये प्रवास केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणी मेट्रोवर नेटकऱ्यांनी टीका केल्या होत्या, दरम्यान आता दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक कपल किस करत असल्याचे दिसत आहे.  

नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट करत हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कपल उभे आहे. हे कपल अचानक किस करत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडिया काही नेटकऱ्यांनी समर्थन केलं आहे तर काहींनी ट्रोल कंल आहे. 

हे कसलं प्रेम? बॉयफ्रेंडला Kiss करताना अडचण यायची म्हणून गर्लफ्रेंडने कापली जीभ

व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. दिल्ली, पाटणा जंक्शनवरून व्हायरल झालेल्या लाजिरवाण्या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये प्रवाशांना लाज वाटली, अशी कॅप्शमनही दिली आहे. एका यूजरने लिहिले की, या लोकांनी दिल्ली मेट्रोला पाटणा जंक्शन लाइव्ह केले आहे.

दरम्यान काही नेटकऱ्यांनी य़ा कृत्याच समर्थन केलं आहे. 'तुम्हाला काही समस्या असल्यास डोळे बंद करा. तो कुणाला काय करतोय? ते बाजूला शांतपणे उभे आहेत.पण, काही लोकांना इतरांच्या आयुष्यात घुसण्याची सवय असते, अशी कमेंट त्या युझरने केली आहे.

काही दिवसांपूर्वी पटना रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या एलईडीमध्ये अश्लील फिल्म चालवली होती. हा व्हिडीओ सुमारे ३ मिनिटे चालला, ज्यामुळे प्रवाशांना लाज वाटली. काही लोकांनी त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. नंतर रेल्वेनेही कारवाई केली आणि दोन एफआयआर नोंदवले. याशिवाय स्क्रीनवर जाहिरात प्रसारित करणाऱ्या एजन्सीचा करारही रद्द करण्यात आला आहे.

Web Title: viral news delhi metro new video couple kissing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.