Video: जबरदस्त! हिम्मत असायला हवी, दिव्यांग डिलिव्हरी बॉयच्या धाडसाचे नेटकऱ्यांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 08:59 PM2023-02-11T20:59:36+5:302023-02-11T20:59:41+5:30

सोशल सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती झोमॅटोच्या डिलिव्हरीचे काम करत असल्याचे दिसत आहे.

viral news divyang delivery boy from zomato goes viral with his cycle on road | Video: जबरदस्त! हिम्मत असायला हवी, दिव्यांग डिलिव्हरी बॉयच्या धाडसाचे नेटकऱ्यांनी केले कौतुक

Video: जबरदस्त! हिम्मत असायला हवी, दिव्यांग डिलिव्हरी बॉयच्या धाडसाचे नेटकऱ्यांनी केले कौतुक

Next

सोशल सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती झोमॅटोच्या डिलिव्हरीचे काम करत असल्याचे दिसत आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्यकीतचे सध्या सोशल मीडियावरव कौतुक होत आहे. 

हा व्हिडीओ हिमांशू नावाच्या युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक दिव्यांग मुलगा त्याच्या तीन चाकी वाहनावर झोमॅटोची डिलिव्हरी घेत असल्याचे दिसत आहे. त्याने झोमॅटोचे कपडेही घातले आहेत आणि हेल्मेटही घातले आहे. दरम्यान, त्याच्याजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

Rohit Sharma Irfan Pathan, IND vs AUS Video: "भाई, जरा थांब... आपल्याला ४ टेस्ट मॅच खेळायच्यात..." रोहितचा धमाल विनोदी किस्सा अन् इरफान पठाण हसून लोटपोट

व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने त्या दिव्यांग व्यकीतसोबहत चर्चा केली. यावळी त्यांनी  विचारले की, तुम्ही हे चांगले काम करता. त्या डिलिव्हरी बॉयने हसून उत्तर दिले की हो मी करतो. आणि ते करायला हिंमत लागते. त्या व्यक्तीने त्याला विचारले की मी ते सोशल मीडियावर पोस्ट करेन, त्याने होकारार्थी मान हलवली.

ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मुलाचे कौतुक करण्यास सुरुवात केली. मात्र, दिव्यांग मुलाने डिलिव्हरी बॉयची नोकरी स्वीकारण्याची ही पहिलीच घटना नाही. काही दिवसापूर्वी लखनऊच्या एका डिलिव्हरी बॉयची गोष्टही व्हायरल झाली होती, जो गाझीपूरहून लखनऊला आला होता आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Web Title: viral news divyang delivery boy from zomato goes viral with his cycle on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.