केळाने केला मोठा घोटाळा! परेडमध्ये N लिहून फेकलं, गोंधळ उडाला, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 07:42 PM2023-03-16T19:42:44+5:302023-03-16T19:44:00+5:30

केळी खाणे आरोग्यासाठी चांगली असल्याचं बोललं जातं. डॉक्टर आपल्याला दररोज केळी खाण्याचा सल्ला देतात.

viral news During the parade, N was written on a banana and thrown | केळाने केला मोठा घोटाळा! परेडमध्ये N लिहून फेकलं, गोंधळ उडाला, नेमकं प्रकरण काय?

केळाने केला मोठा घोटाळा! परेडमध्ये N लिहून फेकलं, गोंधळ उडाला, नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

केळी खाणे आरोग्यासाठी चांगली असल्याचं बोललं जातं. डॉक्टर आपल्याला दररोज केळी खाण्याचा सल्ला देतात. केळीमध्ये आढळणारे कर्बोदके, जीवनसत्त्वे A, C आणि B-6, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम, पोटॅशियम शरीराला संपूर्ण पोषण असतात. त्यामुळे आपण केळी खातो. केळीचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. आता एका केळीने मोठा गोंधळ सुरू झाला आहे. एक परेड कार्यक्रम चक्क एका केळामुळे बंद झाला आहे. 

हे प्रकरण अमेरिकेचे आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिकांच्या समर्थनार्थ लोक परेड काढत होते. कृष्णवर्णीय व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, एका व्यक्तीने एक केळी फेकली, या केळीवर 'एन' हा शब्द लिहिलेला होता. जेनिफर लॉरेन्सच्या २४ वर्षीय मुलीजवळ ही केळी येऊन पडली. हे पाहून तिला धक्काच बसला. तिने लगेच केळीचा फोटो आईला पाठवला आणि रडू लागली. यावेळी तिला रडताना पाहून कार्यक्रमात गोंधळ  उडाला. 

Babar Azam: "IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा'

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एन शब्दाचा यात काय संबंध?  अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांना अनेकदा वांशिक टीकेला सामोरे जावे लागते. त्यांच्यावर अत्याचार होतात. पण एका खास पद्धतीने त्यांचा छळ केला जातो. त्यांच्यावर एक केळी फेकली जाते, ज्यावर N हा शब्द लिहिला जातो.  हा कृष्णवर्षीय लोकांसाठी वापरला जाणारा हा शब्द  आहे. अनेक सेलिब्रिटीही या परिस्थितीतून गेले आहेत. प्रसिद्ध F-1 सर्कल ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन यांनी देखील एकदा सांगितले होते की, त्यांना सतत गैरवर्तनाचा सामना करावा लागतो. त्यांच्यावरही गोरी मुलं केळी फेकायचे आणि शिवीगाळ करायचे.

आपल्या मुलीसोबत घडलेल्या या घटनेमुळे जेनिफर लॉरेन्स चांगलीच संतापली आहे. यावेळी त्यांनी  परेडच्या आयोजकांना जाब विचारला. 'एक व्यक्ती वाईट शब्दात केळी फेकून निघून गेली आणि कोणीही काहीही केले नाही. हे माझ्या मुलाच्याच नव्हे तर कोणत्याही मुलाच्या बाबतीत घडू नये' , असं त्यांनी यावेळी म्हटले. संपूर्ण कुटुंब परेडवर बहिष्कार घालणार असल्याचे त्यांची बहीण डॅनिएल सॅंटियागो यांनी सांगितले. यानंतर परेड सुकाणू समितीच्या अध्यक्षांनी माफीनामा जारी केला. या त्या म्हणाल्या की, जो कोणी दोषी असेल त्याला शोधून काढू. लॉरेन्सने त्याचा एक फोटोही फेसबुकवर शेअर केला. हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. 

Web Title: viral news During the parade, N was written on a banana and thrown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.