ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 08:16 PM2024-11-08T20:16:13+5:302024-11-08T20:17:47+5:30

गुजरातमध्ये कारवर अंत्यसंस्कार केल्याची अजब घटना समोर आली आहे.

viral news It's amazing to hear! Funeral of a 12-year-old car, mausoleum built at a cost of four lakhs | ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

एखाद्या वस्तुवर आपले मनापासून प्रेम झालेले असते. त्या वस्तुची आपल्याला सवय झालेली असते. तुम्ही कारचे अंत्यसंस्कार केल्याचे कधी पाहिले आहे का?  गुजरातमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाने त्यांच्या जुन्या पण नशीबवान कारला भंगारात न देता अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे.

त्यांनी त्यांच्या १२ वर्ष जुन्या वॅगन आर कारचे पूर्ण विधी करून अंत्यसंस्कार केले. यासाठी त्यांनी चार लाखांहून अधिक रुपये खर्च केले. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील लाठी तालुक्यातील पडरशिंगा गावातील संजय पोल्लारा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी त्यांच्या जुन्या कारवर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार केले.

अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

धार्मिक परंपरांचे पालन करून साधू-संतांसह सुमारे १५०० लोक सहभागी झाले आणि त्यांना मेजवानी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या बनवलेल्या व्हिडिओमध्ये पोलारा कुटुंबीयांनी त्यांच्या १२ वर्षांच्या वॅगन आर कारची समाधी बनवण्यासाठी १५ फूट खोल खड्डा खोदला होता. अंतिम निरोप देताना गाडी हिरव्या कपड्याने मढवली होती आणि फुलांच्या हारांनी सजवण्यात आली होती.

धार्मिक विधी दरम्यान, पुजाऱ्यांनी गाडीवर गुलाबाच्या पाकळ्या शिंपडल्या आणि मंत्रांचा उच्चार केला. सरतेशेवटी खोदकाम यंत्राच्या सहाय्याने गाडी खोल खड्ड्यात नेऊन त्यावर माती टाकून समाधी तयार करण्यात आली. सुरतमधील बांधकाम व्यवसायिक  पोलारा म्हणाले की, भविष्यातील पिढ्यांच्या स्मरणात कुटुंबासाठी खूप भाग्यवान ठरलेली कार जतन करण्याचा हा प्रयत्न आहे.

ही कार त्यांनी १२ वर्षांपूर्वी खरेदी केली होती. ती कार येताच त्यांच्या घरात सुख-समृद्धी आली. व्यवसायात यश आणि कुटुंबासाठी मोठा आदर. त्यामुळे पोलारा यांनी या हिंदू विधी अंत्यसंस्कार सोहळ्यावर चार लाख रुपये खर्च केले. ते त्या गाडीच्या समाधीवर एक झाडही लावणार आहेत.

Web Title: viral news It's amazing to hear! Funeral of a 12-year-old car, mausoleum built at a cost of four lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.