'हे OYO नाही, कॅब आहे, इथे रोमान्स नाही...', चालकाने लिहिली नोटीस, होतेय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 05:37 PM2024-10-21T17:37:24+5:302024-10-21T17:38:15+5:30
हैदराबादमधील एका कारमधील एक नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर एका कारमधील नोटीस व्हायरल झाली आहे. ही नोटीस हैदराबादमधील एका कार मधील आहे. येथे एका ड्रायव्हरने आपल्या कॅबमध्ये खास विनंती असलेली नोटीस लावली आहे. कॅब ड्रायव्हरने एका पोस्टरद्वारे कपलला कॅबमध्ये रोमान्स न करण्याचा इशारा दिला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कॅब ड्रायव्हरने पोस्टरवर लिहिले आहे की, शांतपणे बसा आणि अंतर राखा. हे ओयो नाही तर कॅब आहे. ही नोटीस आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. एका कॅब ड्रायव्हरने आपल्या कारमध्ये नोटीस लावली असून, सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय बनली आहे. कॅबमधील नोटीस व्हायरल होत आहे कारण त्यात ड्रायव्हरने कॅबमध्ये बसलेल्या कपलांना खास आवाहन केले आहे.
कॅबमधील नोटीसवर ड्रायव्हरने रोमँटिक जोडप्यांविरोधात इशारा लिहिला आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे की, ही कॅब आहे, खासगी ठिकाण किंवा ओयो नाही. कृपया अंतर राखा आणि शांतपणे बसा असं यात लिहिले आहे. ही नोटीस चालकाने सीटच्या पाठिमागे चिटकवली आहे.
कॅबमध्ये बसलेल्या एका तरुणाने त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला, हा फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर यावर कमेंट येत आहेत.