'हे' आहेत २०२० चे सगळ्यात असुरक्षित अन् सुमार पासवर्ड; तुमचाही असेल तर वेळीच सावध व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 05:58 PM2020-11-20T17:58:38+5:302020-11-20T18:50:03+5:30
२०२० च्या सगळ्यात सुमार पासवर्डची यादी समोर आली आहे. ही यादी पाहून तुम्हाला पासवर्ड कसा असून नये हे नक्की कळेल.
आयुष्य कॉम्पलिकेटेड असेल तर माणूस खूप वैतागतो. पण जर पासवर्ड कॉम्प्लिकेडेट नसेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी फसवणूकीचे शिकार होऊ शकता. म्हणून पासवर्ड हा नेहमी सहज लक्षात येणार नाही असा कॉम्प्लिकेटेड असावा. कारण सध्याच्या काळाच ऑनलाईन पैश्याचे व्यवहार किंवा गोपनीय माहिती, वैयक्तीक माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर पासवर्ड महत्वाच असतो. २०२० च्या सगळ्यात सुमार पासवर्डची यादी समोर आली आहे. ही यादी पाहून तुम्हाला पासवर्ड कसा असून नये हे नक्की कळेल.
सगळ्यात सुमार पासवर्ड १२३४५६
पासवर्ड मॅनेजर कंपनी नॉर्डप्रेसकडून २०२० मध्ये लोकांकडून वापरण्यात आलेल्या सगळ्यात सुमार पासवर्डची यादी देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार १२३४५६ हा पासवर्ड अनेकांनी मोठ्या प्रमाणात वापरला आहे. हा पासवर्ड सगळ्यात जास्त असुरक्षित आहे. त्यानंतर १२३४५६७८९ हा क्रमांकसुद्धा पासवर्डसाठी असुरक्षित आहे. नॉर्डप्रेसने दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या पासवर्डबाबत सहज माहिती मिळू शकते. ५० फूट खोल विहिरीत पडलं हत्तीचं पिल्लू; अन् शेतकऱ्याला आवाज येताच सुरू झालं रेस्क्यू; पाहा फोटो
पासवर्ड ठेवताना कोणत्या चूका टाळाव्यात याबाबत कंपनीने सांगितले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार picture1, password, 123456789, 111111, 12345, 123123, abc 123, i love you, aaron143,qqww1122 असे पासवर्ड ठेवल्यास तुमची माहिती हॅक होऊ शकते. याशिवाय aarom, pokemon, chocolet असे पासवर्ड्स तुम्ही ठेवले असतील असतील तर आजच्या आज बदला. VIDEO: २२ वर्षांचा तरुण करतोय चौथ्या लग्नाची तयारी; तीन बायकांसह घेतोय चौथीचा शोध