अशक्य! फक्त १५ सेकंदात या चौघी मिळून झाल्या वाघ; विश्वास बसत नाही?, मग पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:01 PM2020-11-09T13:01:19+5:302020-11-09T13:11:58+5:30

Viral Video in Marathi : या मुलींनी अगदी हुबेहुब वाघासारखा बॉडी पेंट केलं आहे. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral News in Marathi : 4 girls body painted as tiger video viral | अशक्य! फक्त १५ सेकंदात या चौघी मिळून झाल्या वाघ; विश्वास बसत नाही?, मग पाहा व्हिडीओ

अशक्य! फक्त १५ सेकंदात या चौघी मिळून झाल्या वाघ; विश्वास बसत नाही?, मग पाहा व्हिडीओ

Next

वाघ चित्रांमध्ये, व्हिडीओमध्ये पाहायला चांगला वाटतो. पण प्रत्यक्षात वाघ समोर आला तर काय होईल याची अनेकांनी कल्पनाही केलेली नसते. सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण अवघ्या  १५ सेकंदात या मुलींनी वाघाचं रूप धारण केलं आहे. रॅक्स चॅपमन या ट्विटर युजरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही आहे.  या मुलींनी अगदी हुबेहुब वाघासारखा बॉडी पेंट केलं आहे. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या तरुणी कोणत्या देशाच्या आहेत, ही माहिती नसली तरी सोशल मीडियावर या तरुणींचं कौतुक केलं जात आहे. ५९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. 15  सेकंदांच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकुळ  घातला आहे. या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्चा वर्षाव केला असून या मुलींनी स्वतःला पेंट करून घेतलंय यावर विश्वास बसत नसल्याचे सांगितले आहे. 

भारतातील दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ कॅमेरात कैद

फोटोग्राफर सौमेन बायपेयी मागच्या वर्षी  नंदनकावन अभयारण्यात गेले  होते. तेव्हा त्यांना मेलानिस्टिक वाघ (Melanistic Tiger)  दिसला. वाघांची ही प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मेलानिस्टिक ही वाघाची दुर्मिळ प्रजात आहे. या प्रजातीचे वाघ ओडिसामध्ये दिसून येतात. दिवसेंदिवस या वाघांची संख्या कमी होत आहे. थोड्याफार प्रमाणात वाघ अस्तित्वात आहेत. 

मुळचे पश्चिम बंगालच्या पंसकुरा येथिल रहिवासी असलेले सौमेन बायपेयी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नंदनकावनमध्ये पक्षी निरिक्षण करत होते. सुरूवातीला त्यांना वाघाला पाहिल्याचे जाणवले. एनडीटीव्हीशी बोलताना सौमेन यांनी सांगितले की, '' मी झाडाझुडूपांमध्ये पक्षी आणि माकडांचे निरिक्षण करत होतो. तेव्हा अचानक समोर वाघासारखे काहीतरी दिसले. पण  तो सामान्य वाघ नव्हता. त्यावेळी मला मेलेनिस्टीक या वाघांच्या प्रजातींबद्दल काहीही कल्पना नव्हती. काही सेंकद थांबून वाघ पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला. आतापर्यत मी अनेक वाघ पाहिले पण असा वाघ पाहिला नव्हता. '' Video : पाकमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली मेट्रो; पब्लिकची प्रवासाची स्टाईल पाहून पोट धरून हसाल

ci14tdd

या दरम्यान वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सौमेन यांनी आपल्या कॅमेरात वाघाचे फोटो कैद केले होते.  वाघांबद्दल सांगताना सौमेन म्हणाले होते की, १९९३ मध्ये त्यानंतर २००७ मध्ये ओडिशाच्या सिमलीपाल टायगर रिझर्व्हमध्ये मेलिस्टिक वाघांची उपस्थिती नोंदवली गेली. त्यानंतर, काही वर्षांनंतर, नंदकन अभयारण्यात एका वाघाने चार छाव्यांना जन्म दिला. त्यातील दोन मेलेनिस्टीक होते. ते दोन मेलेनिस्टीक वाघ त्वरित लक्षात आले आणि त्यांच्या वाढीची सीसीटीव्हीद्वारे देखरेख केली गेली. एक वर्षानंतर, त्याला मोकळ्या वातावरणात आणले गेले.  क्या बोनस है रे बाबा! बोनसची वाट पाहण्याच्या नादात नेटकऱ्यांनी पाडला भन्नाट मीम्सचा पाऊस; पाहा फोटो

Web Title: Viral News in Marathi : 4 girls body painted as tiger video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.