अंघोळीला गरम पाणी कमी पडत होतं; म्हणून चिमुरड्यानं केला 'असा' जुगाड, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 06:46 PM2020-12-30T18:46:30+5:302020-12-30T19:01:17+5:30
Trending Viral News in Marathi : गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी चिमुरड्यानं एक अनोखा जुगाड केला आहे.
दिवसेंदिवस वातावरणात गारवा वाढत चालला आहे. थंडीच्या दिवसात अनेकांची अंथरूणातून उठण्याची इच्छाच होत नाही. काहीजण तर दिवसभरात लोळत असतात. अशात अंघोळ करायची म्हटलं तर खूपच कंटाळा येतो. थंडीच्या वातावरणात गार पाणी अंगावर टाकण्याची धास्ती वाटत असते. सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी चिमुरड्यानं एक अनोखा जुगाड केला आहे.
आवश्यकता अविष्कार की जननी है।
— Pankaj Rajput IFS (@rajput85) December 30, 2020
Necessity is the mother of invention.@AnkitKumar_IFSpic.twitter.com/3XUYZHS1OZ
आयएफएस अधिकारी पंकज राजपूत यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आवश्यकता अविष्काराची जननी असल्याचे या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहता येईल एक चिमुरडा कढईत बसला आहे. विशेष म्हणजे ही कढई एका जळत्या चुलीवर ठेवली आहे. खालून आग जळत असल्याचे दिसून येत आहे. बाबो! पाण्याच्या टाकीवर जाऊन उभा राहिला बैल; अन् लोक म्हणाले मौसी को बुलाओ रे.......
गरम पाणी अंगावर टाकण्यासाठी या मुलाचा सगळा खटाटोप सुरू आहे. एखाद्या गावाच्या ठिकाणाचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला असावा. तीस सेंकदाच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक गमतीदार कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. १० वर्षांपूर्वी शाळकरी मुलानं केलेली भविष्यवाणी होतेय व्हायरल; २०२० बद्दल म्हणाला होता की.....
(या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे स्टंट कोणीही करू नये. यामुळे जीवला धोका उद्भवू शकतो.)