विद्यार्थ्याने कबीरदासांवर असा निबंध लिहिला, शिक्षकाने डोक्यावर हात मारुन घेतला, उत्तर पत्रिका झाली व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:14 PM2022-12-01T16:14:54+5:302022-12-01T16:15:59+5:30
सोशल मीडियावर सध्या शाळेतील परीक्षांच्या उत्तर पत्रिका व्हायरल होत आहेत. यात विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तर दिलेली असतात. सध्या अशीच एक उत्तर पत्रिका व्हायरल झाली आहे.
सोशल मीडियावर सध्या शाळेतील परीक्षांच्या उत्तर पत्रिका व्हायरल होत आहेत. यात विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तर दिलेली असतात. सध्या अशीच एक उत्तर पत्रिका व्हायरल झाली आहे. मुल शाळेत परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहतात तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही तर काही उत्तरे लिहून निघून जातात. मात्र, असे काही विद्यार्थी आहेत जे वेगळच काहीतर लिहीतात. एका आठवीच्या वर्गातल्या एका विद्यार्थ्याने कॉपीमध्ये असे काही लिहिले आहे ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर 'वार्षिक परीक्षा' असे लिहिले आहे. या हिंदी परीक्षेत विद्यार्थ्याला दोन प्रश्न विचारण्यात आले. इयत्ता आठवीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये निबंध आणि लेख समाविष्ट केले जातात. शिक्षकाने प्रश्न क्रमांक एकमध्ये कबीरदासांवर निबंध लिहिण्यास सांगितले, त्यात विद्यार्थ्याने धक्कादायक उत्तर लिहिले. विद्यार्थ्याने उत्तर क्रमांक एकमध्ये कबीरदास लिहून त्यावर निबंध लिहिला. तर प्रश्न क्रमांक दोनमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर लेख लिहिण्यास सांगितले असता विद्यार्थ्याने अमिताभ बच्चन अस लिहिलेल दिसत आहेत.
वर्गात शिक्षिकांसमोरच पोरांनी म्हटली 'औरत चालीसा'; याला आचरटपणा म्हणावे की..
हे उत्तर पाहून शिक्षकाने कपाळाला हात लावला असावा. उत्तर पत्रिका तपासल्यानंतर शिक्षकाने 100 गुणांपैकी फक्त शून्य गुण दिले आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर खूप मजेदार कमेंट येत आहेत. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना पत्र लिहिले होते, जे व्हायरल झाले होते.