Viral Video : धक्कादायक! कपड्याच्या खिशात 'ही' वस्तू राहिली, वॉशिंग मशीन चालू होताच झाला मोठा स्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:32 PM2023-04-04T13:32:33+5:302023-04-04T13:32:49+5:30

सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

viral news such a thing left in pocket of the clothes washing machine exploded as soon as it started running | Viral Video : धक्कादायक! कपड्याच्या खिशात 'ही' वस्तू राहिली, वॉशिंग मशीन चालू होताच झाला मोठा स्फोट!

Viral Video : धक्कादायक! कपड्याच्या खिशात 'ही' वस्तू राहिली, वॉशिंग मशीन चालू होताच झाला मोठा स्फोट!

googlenewsNext

आपण कपडे धुण्याअगोदर कपड्यांचे सर्व खिसे तपासून घेतो. खिशात एखादी वस्तु राहिली तर ती आपण काडतो. यानंतर आपण कपडे धुण्यासाठी देत असतो, खिसा नाही तपासला तर आपली महत्वाची कागदपत्रे किंवा पैसे पाण्याने ओले होतात. सध्या आपल्याकडे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे आता कपड्यांचे खिसे तपासणे महत्वाचे आहे, कारण एखादी वस्तु राहिली तर मशिन बिघडू शकते किंवा एखादी मोठी दुर्घनाही घडू शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात वॉशिंग मशीनमध्ये मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे.

एका ट्विटर वापरकर्त्यांने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात वॉशिंग मशिनचा मोठा स्फोट झाल्याचा दिसत आहे. कपडे धुण्यासाठी मशीनमध्ये ठेवलेल्या कपड्यांच्या खिशात काही ज्वलनशील पदार्थ राहिले होते. मशिन सुरू होताच मोठा स्फोट झाला. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक असा निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला देत आहेत. व्हिडीओला २१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Optical Illusion: कुठे लपवली आहे ग्लॅडिएटरची तलवार? शोधण्यात 90 टक्के लोक झाले फेल....

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका लाँड्री सेंटरमध्ये वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुत असताना एवढा मोठा स्फोट झाल्याचे दिसतंय. यात फक्त मशिनच नव्हे तर दुकानही उडाले आहे. यात मालासह मोठी जीवितहानी झाली असती. मशीनमध्ये टाकण्यापूर्वी कापड नीट तपासले नाहीत, त्यामुळे कपडाच्या खिशात काही पदार्थ राहिले असल्याचा अंदाज लावला जात आहे. यामुळे असा मोठा स्फोट झाला. 

या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी यात सल्ले दिले आहेत तर काहींनी हे प्रकरण समजावून सांगितले आहे. एका वापरकर्त्यांने लिहिले, यात खिशात ठेवलेल्या काही वस्तू गृहोपयोगी उपकरणांसाठी टाइम बॉम्ब म्हणून काम करू शकतात. यामध्ये लाइटर, मॅच आणि एरोसोल कॅन सारख्या ज्वलनशील वस्तूंचा समावेश असू शकतो. यामुळेही स्फोट होऊ शकतो. त्यामुळे कपडे धुण्यासाठी देणअयाअगोदर अशा वस्तु काढून टाकल्या पाहिजेत, असं त्या वापरकर्त्यांने लिहिले आहे. 

Web Title: viral news such a thing left in pocket of the clothes washing machine exploded as soon as it started running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.