अरे बापरे! दारुच्या नशेत तरुणाने मित्राशीच केले लग्न, सासरी पोहोचल्यानंतर सारेच झाले अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 06:06 PM2023-03-01T18:06:03+5:302023-03-01T18:06:21+5:30
दारु ही वाईटच असते, अनेकजण ती आनंदातही पितात आणि दु:खातही पितात. दारुच्या नशेत कधी कोण काय करेल सांगता येत नाही, दारुच्या नशेत कधी मोठे वाद-विवाद होतात तर कधी झालेले वादही मिटतात.
दारु ही वाईटच असते, अनेकजण ती आनंदातही पितात आणि दु:खातही पितात. दारुच्या नशेत कधी कोण काय करेल सांगता येत नाही, दारुच्या नशेत कधी मोठे वाद-विवाद होतात तर कधी झालेले वादही मिटतात. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. दोन तरुणांनी दारुच्या नशेत एकमेकांसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण बाहेच्या देशातील नाही, तेलंगणामधील आहे.
ही घटना तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील आहे. या ठिकाणी दोन तरुणांनी आधी मद्यपान केले आणि नंतर नशेच्या अवस्थेत लग्न केले. लग्नाची बातमी समजताच या दोन तरुणांच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला.
ही घटना १ मार्चची आहे. कोलचाराम परिसरातील दामपलाकुंटा येथील एका दारूच्या दुकानात दोन्ही तरुणांची भेट झाली. दोघांनी भरपूर मद्यपान केले आणि नशेच्या अवस्थेत एकमेकांशी लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक तरुण संगारेड्डी जिल्ह्यातील जोगीपेट येथील असून एक चिलपचेडमधील चांदूर येथील आहे. या दोन्ही तरुणांचे वय २१ आणि २२ वर्षे आहे.
लग्नानंतर दुसऱ्या दिवशी हा तरुण चांदूर गावातील तरुणाच्या घरी गेला आणि त्याने लग्न करून आपल्या घरी राहण्यास आलो असल्याचे सांगितले. हे ऐकून तरुणाच्या आई-वडिलांना धक्काच बसला. त्यांनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले, मात्र तरुणाने त्यांचे ऐकले नाही आणि एक लाख रुपये द्याल तर निघून जाऊ, असे सांगितले. चांदूर रहिवासी असलेल्या आई-वडिलांनी त्याचे ऐकले नाही तेव्हा तरुणाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
यानंतर प्रकरण गुंतागुंतीचे होत असल्याचे पाहून पोलिसांनी आणि गावातील ज्येष्ठांनी दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना बोलावून चर्चा केली. अखेर चांदूर रहिवासी कुटुंबीयांनी जोगीपेठ येथील तरुणाला १० हजार रुपये दिले, त्यानंतर तरुणाने आपली तक्रार मागे घेतली.