धक्कादायक! दुसऱ्या मुलींकडं बघणं प्रियकराला भोवलं; प्रेयसीने डोळ्यातच रेबीजची सुई टोचली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 03:30 PM2023-11-30T15:30:45+5:302023-11-30T15:32:52+5:30
एका प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या डोळ्यात रेबीजची सुई टोचल्याचे प्रकरण समोर आले आहे.
गेल्या आठ वर्षापासून लिव्हइनमध्ये राहणाऱ्या कपलमध्ये एक दिवस अचानक मोठा वाद सुरू झाला. वाद एवढा वाढला की दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली, यावेळी महिलेने अचानक प्रियकराच्या डोळ्यात सुई टोचली. यामुळे प्रियकर भयभीत झाला. त्याने फोनवर ९११ नंबर डायल करुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळ गाठून प्रियकराला जवळ असणाऱ्या रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू केले. यावेळी चौकशीत त्या तरुणीने रेबीजचे इंजेक्शन डोळ्यात टोचल्याचे समोर आले. या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे.
या वृद्ध व्यक्तीची हरवली आहे पत्नी, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज; तुम्हीही ट्राय करा!
ही धक्कादायक घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. एक कपल गेल्या आठ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, मात्र गेल्या शनिवारी रात्री दोघांमधील जोरदार भांडण झाले. मियामी-डेड काउंटीमधील एका घरात ही घटना घडली. तरुणीला प्रियकर इतर मुलींकडेही बघत असल्याचा राग होता. शनिवारी रात्री १० वाजता जोडपे घरी पोहोचल्यानंतर, प्रियकर सोफ्यावर होता, तेव्हा त्यांच्यात भांडण वाढले, दरम्यान, प्रेयसीने त्याच्या डोळ्यांत रेबीज इंजेक्शन टोचले.
यावेळी प्रियकराला जास्त त्रास सुरू झाला. त्याने लगेच पोलिसांना ९११ वर घटनेची माहिती दिली, त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्याला जॅक्सन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सँड्रा जिमेनेझला अटक केली. या संपूर्ण घटनेवर पीडितेने सांगितले की, तिने हे इंजेक्शन आपल्या कुत्र्यांसाठी आणले होते.