बदलेकी आग! एक्स गर्लफ्रेंडच्या घरी कॅश ऑन डिलिव्हरी; थोडेथोडके नाही ३०० बॉक्स पाठवले...
By संतोष कनमुसे | Updated: April 11, 2025 15:40 IST2025-04-11T15:39:36+5:302025-04-11T15:40:12+5:30
प्रेमात ब्रेक अप झाल्यानंतर तरुण-तरुणी एकमेकांविरोधात राग मनात ठेवतात. ते बदलाही घेतात.

बदलेकी आग! एक्स गर्लफ्रेंडच्या घरी कॅश ऑन डिलिव्हरी; थोडेथोडके नाही ३०० बॉक्स पाठवले...
प्रेमात प्रत्येकजण कधी ना कधी पडतोच. पण प्रत्येकाला त्यात यश मिळेलच असे नाही. काहींना प्रेमात यश मिळते, तर काहींचं नाते मध्येच तुटते. ब्रेकअपनंतर अनेकजण स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टी आपण अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिल्या आहेत. चित्रपटांमध्ये प्रेमात धोका मिळाल्यावर एखादा प्रियकर बदल्याची आग मनात ठेवतो, कधी तो अधिकारी बनून परततो, तर कधी करोडपती होऊन तिच्या आयुष्यात वादळ निर्माण करतो. असाच एक भन्नाट प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात ब्रेकअपनंतर आपल्या एक्स गर्लफ्रेंडला त्रास द्यायचा म्हणून एका तरुणाने भन्नाट आयडिया वापरली आहे, याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
हे प्रकरण पश्चिम बंगाल येथील आहे. २४ वर्षीय एक तरुण बँकेत नोकरी करतो. तो तरुण एका तरुणीच्या प्रेमात होता. पण, काही कारणामुळे त्यांचा ब्रेकअप २०२४ च्या नोव्हेंबरमध्ये झाला. पण, त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर गोष्ट इथेच संपली नाही. त्या तरुणाने बदला घेण्याचे ठरवले. यासाठी त्याने एका भन्नाट आयडिया वापरली. यासाठी त्याने ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर करण्यास सुरूवात केली.
फॉर्च्यूनरच्या किमतीपेक्षा महागडी नंबरप्लेट, केरळच्या व्यावसायिकाने लावली सर्वात मोठी बोली
तरुणीला शॉपिंगची आवड होती
त्या तरुणीला शॉपिंगची आवड आहे हे त्या तरुणाला माहित होते. त्याने तिच्या घरी अमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून दररोज पार्सल मागवले. हे पार्सल त्याने त्या तरुणीच्या घरच्या पत्त्यावर पाठवले. पण यात त्याने कॅश ऑन डिलिव्हरी ठेवली. यामुळे त्या तरुणीला त्रास होऊ लागला. ४ महिन्यांत, तिच्या पत्त्यावर अंदाजे ३०० बॉक्स पोहोचले होते. यातील तिने एकही वस्तू ऑर्डर केली नव्हती. यापैकी बहुतेक महागडे गॅझेट्स किंवा खूप महागडे कपडे होते. ती तरुणी हे पार्सल घेण्यास नकार देत होती. पण ऑर्डर इतक्या वेळा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणामुळे अमेझॉन आणि फ्लिपकार्टही या कंपन्याही वैतागल्या आहेत.
वैतागून तरुणीने पोलिसात तक्रार दिली
त्रासलेल्या मुलीने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला. यामध्ये २५ वर्षीय सुमन सिकदरचा हात होता. तो त्या मुलीचा एक्स बॉयप्रियकर होता. तिचा बदला घेण्यासाठी त्याने असं केल्याचे कबुल केले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात सुमन सिकदर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो कोलकाता येथील रहिवासी असलेल्या पीडितेला त्रास देत होता. तो तिच्या पत्त्यावर महागडे 'कॅश ऑन डिलिव्हरी' पार्सल पाठवत होता.