महिलेने चुकून दुसऱ्याच नंबरवर ट्रान्सफर केले पैसे, रक्कम परत मागताच पुढे जे घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 01:08 PM2023-09-13T13:08:02+5:302023-09-13T13:12:06+5:30

तुम्हीही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर हे नक्की वाचा

viral news woman sends money to wrong number share screenshot how she got money back internet Online Payment transfer | महिलेने चुकून दुसऱ्याच नंबरवर ट्रान्सफर केले पैसे, रक्कम परत मागताच पुढे जे घडलं...

महिलेने चुकून दुसऱ्याच नंबरवर ट्रान्सफर केले पैसे, रक्कम परत मागताच पुढे जे घडलं...

googlenewsNext

Viral News Online Payment : हल्लीचे युग हे डिजिटल युग आहे. आजकाल पैशांची देवाणघेवाण ही ऑनलाइन ट्रान्सफरच्या माध्यमातून अतिशय सोयीने होते. विविध अँप्सच्या माध्यमातून हल्ली मोठ्या प्रमाणात व्यवहार चालतात. बँकेच्या अकाऊंट नंबरवरून पैसे ट्रान्सफर केले जातात. UPI च्या मदतीनेदेखील पैशांची व्यवहार केले जातात. तसेच आता तर बारकोडच्या स्कॅन किंवा अगदी मोबाईल नंबरच्या मदतीनेही फोनच्या द्वारे पैसे पाठवले जातात. लोकांना आता व्यवहाराची ही पद्धत अंगवळणी पडली आहे. पण असे असले तरी काही वेळी चुकून एकाचे पैसे दुसऱ्याच अकाऊंटला ट्रान्सफर करण्याच्या चुका युजर्सकडून घडतात. अशा वेळी पुढे काय घडते, याचे प्रत्येकाची अनुभव वेगवेगळे असतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. जाणून घेऊया त्यात काय घडलं?

एका महिलेने ट्विट केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये महिलेने चुकीने चुकीच्या नंबरवर पैसे कसे पाठवले हे सांगितले. या घडलेल्या प्रकारानंतर तिने त्या व्यक्तीशी UPI अँपवरूनच चॅट केले आणि त्याच्याकडे पैसे परत मागितले. त्यावर त्याने सुरूवातीला पैसे परत करणार नाही असे सांगितले. पण नंतर जे घडलं ते नक्कीच अनपेक्षित होतं.

महिलेने तिच्या या चुकीबद्दल आणि नंतर झालेल्या चॅटिंगबद्दल काही स्क्रीनशॉट शेअर केले. तिने आधी चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर ते पैसे चॅटिंगद्वारे परत मागितले. आधी समोरच्या व्यक्तीने नकार दिला. पण नंतर मात्र, ती व्यक्ती मस्करी करत असल्याचे त्याने सांगितले आणि पैसेदेखील परत केले. त्या व्यक्तीने पैसे परत केल्यावर म्हटले की, मला काही क्षणांसाठी सुखद धक्का मिळाला होती की माझ्याकडे स्वत:हून पैसे आलेत, मला जॅकपॉट लागला आहे. पण तो आनंद आता निघून गेला. चुकून पैसे ट्रान्सफर करणाऱ्या महिलेने त्यांचे स्क्रीनशॉट आणि मजेशीर गप्पा शेअर केल्या.

घडल्या प्रकारबाबत केलेल्या ट्विटवर शेकडो युजर्सने कमेंट केल्या. एका व्यक्तीने सांगितले की - जगात काही चांगले लोक आहेत. तर दुसरा एक जण म्हणाला - अशा लोकांमुळेच चांगुलपणा जिवंत असल्याचे दिसते. तुम्हाला या प्रकारावर काय वाटतं, ते तुम्हीही नक्की सांगा.

Web Title: viral news woman sends money to wrong number share screenshot how she got money back internet Online Payment transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.