Optical Illusion: पर्वत की अस्वल, फोटोत आधी जे दिसेल त्यावरून कळेल तुम्ही समस्या कशा सोडवता!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 01:03 PM2022-05-24T13:03:25+5:302022-05-24T13:04:04+5:30
Do You See Mountains Or Bear In viral photo optical illusion: हा व्हायरल फोटो पाहताना जर पहिल्यांदाच जर तीन अस्वल दिसले तर काही वेळाने लक्षात येईल की त्यातही तीन पर्वत आहेत. परंतु येथे मुख्य गोष्ट म्हणजे आपण प्रथम काय पाहताय हेच आहे.
Do You See Mountains Or Bear In viral photo: ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) ट्रेंड संपला आहे, तेव्हाच एक नवीन फोटो व्हायरल होतो. गेल्या काही आठवड्यांमध्ये ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल झाले आणि लोकांनाही विचार करण्यास भाग पाडलं. दरम्यान, ऑप्टिकल इल्युशनवाल्या फोटोंमध्ये सामान्यत: दोन किंवा अधिक गोष्टी दिसतात. यामुळे आपण अनेकदा गोंधळूनही जातो. आता असाच आणखी एक फोटो समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीबाबत माहिती मिळू शकेल.
जर तुम्ही हा व्हायरल फोटो पाहिला तर यामध्ये तीन अस्वलं दिसतील. तर पुन्हा तुम्ही त्याकडे पाहाल तर तुम्हाला त्यात तीन पर्वत दिसतील. परंतु मुख्य बाब ही की त्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतंय. जर तुम्हाला पहिले पर्वत दिसले तर ते व्यक्तिमत्त्वाबद्दल वेगळे रहस्य प्रकट करतील आणि जर अस्वल दिसले तर तुम्हाला तुमच्याबद्दल आणखी काही कळेल. होय, तुम्ही सुरुवातीला जे पाहता ते पाहता तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे तुम्हाला कळेल.
जर अस्वलं दिसली तर...?
जर तुम्हाला फोटोमध्ये तीन अस्वलं दिसली तर समजा तुमचा विचार करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. म्हणजेच तुम्ही समस्यांच्या मूळाशी जाऊन त्याचं विश्लेषण करता. तुम्ही त्या समस्यांना विभागून मग त्यांना सोडवण्याचा एक चांगला मार्ग शोधता.
जर पर्वत दिसले तर...?
जर तुम्हाला फोटोमध्ये पर्वत दिसले तर तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आधारे आपल्या समस्यांचं निराकरण करता. निरनिराळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनुभवाचा वापर करता. तसंच अगदी सहजरित्या तुम्ही त्यांचं निराकरणही करता. तुम्ही सांगा तुम्हाला या फोटोमध्ये पहिले काय दिसलं?