VIDEO : डोकं भंडावून सोडणारा व्हिडीओ, कसं होतंय - विचार करत झोप उडाल्याशिवाय राहणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 02:43 PM2021-06-30T14:43:36+5:302021-06-30T14:47:36+5:30

लोक असे व्हिडीओ किंवा फोटो बघून हैराण होतात. अशा फोटो किंवा व्हिडीओमुळे लोकांच्या मेंदूला चालना मिळते हाही यातील महत्वाचा भाग आहे. 

This Viral Optical Illusion Will Make You Question Your Eyes | VIDEO : डोकं भंडावून सोडणारा व्हिडीओ, कसं होतंय - विचार करत झोप उडाल्याशिवाय राहणार नाही!

VIDEO : डोकं भंडावून सोडणारा व्हिडीओ, कसं होतंय - विचार करत झोप उडाल्याशिवाय राहणार नाही!

Next

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेन नजरेला धोका देणारे फोटो किंवा व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. म्हणजे या चित्रांमध्ये दिसतं वेगळं आणि मुळात असतं वेगळं. लोक असे व्हिडीओ किंवा फोटो बघून हैराण होतात. अशा फोटो किंवा व्हिडीओमुळे लोकांच्या मेंदूला चालना मिळते हाही यातील महत्वाचा भाग आहे. 

ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक समलंब चौकोन दाखवला आहे. म्हणजे ज्याच्या कोणत्याही दोन संमुख बाजू समांतर नसतात असा चौकोन. हा चौकोन ३६० अ‍ॅंगलमध्ये फिरवला तर तो चौकोनासारखा दिसू लागतो. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. (हे पण बघा : जबरदस्त! बिबट्या एक शेपट्या दोन; दुसरा बिबट्या शोधून शोधून दमलेत लोक, बघा तुम्हीही ट्राय करा!)

हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील एका टीव्ही शोमधील आहे. १९७० मधील हा टीव्ही शो होता. यात डीन हटन नावाच्या व्यक्तीने हे डोकं भंडावून सोडणारं प्रात्यक्षिक दाखवलं आहे. यात त्याने 'द एम्स विंडो' ही प्रक्रिया समजावून सांगितली. हा व्हिडीओ जुना आहे. पण तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: This Viral Optical Illusion Will Make You Question Your Eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.