धक्कादायक! प्रेशर कूकरमध्ये 'असं' लपवलं जायचं सोनं; फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

By manali.bagul | Published: September 25, 2020 05:57 PM2020-09-25T17:57:43+5:302020-09-25T18:00:07+5:30

गुन्हेगारांचे पितळ उघडं पाडणारा हा फोटो आहे.

Viral photo of gold smuggled in a pressure cooker | धक्कादायक! प्रेशर कूकरमध्ये 'असं' लपवलं जायचं सोनं; फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

धक्कादायक! प्रेशर कूकरमध्ये 'असं' लपवलं जायचं सोनं; फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

Next

संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या आणि लॉकडाऊन यांमुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होत आहे. पण सामाजात काही  लोक असेही आहेत, ज्यांना या समस्यांशी काहीही देणं घेणं नाही. ते लोक आपापल्या वाईट कृत्यांमध्ये मग्न आहेत. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुन्हेगारांचे पितळ उघडं पाडणारा हा फोटो आहे.

कोरोनाकाळातही जगात सगळ्यात मौल्यवान आणि महागड्या सामानाची तस्करी थांबलेली नाही. 
 हा फोटो पाहून गुन्हेगार तस्करी करण्यासाठी काय काय करू शकतात याचा तुम्हाला अंदाज येईल. सोन्याच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर सोन्याच्या तस्करीचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.  डाळ, भात किंवा खिचडी असे रोजच्या जेवणातील पदार्थ तयार करण्यासाठी ज्या कूकरचा वापर केला जातो. अशा कूकरचा वापर करून सोन्याची तस्करी केली जात होती. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. 

प्रेशर कुकरमध्ये असं सापडलं सोनं

केरळच्या कालीकत आंतराराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीकडे  प्रेशर कूकर होता तपासणी दरम्यान दिसून आलं की या कूकरमध्ये सोनं लपवलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आजूबाजूचे सगळेच लोक चकीत झाले. कूकरच्या तळाला ७०० ग्राम सोनं सापडलं.  तपासणी केल्यानंतर या माणसाला अटक करण्यात आली असून सोनं आणि कूकर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी साबणातून सोन्याची तस्करी होत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

हे पण वाचा-

Video : कुत्र्याच्या पिल्लाला कासवासह खेळण्याची भारीच हौस; नेटिझन्सनी पाडला लाईक्सचा पाऊस

अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

Web Title: Viral photo of gold smuggled in a pressure cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.