Coronavirus: कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह दफन करण्यापूर्वी थकलेला कोविड योद्धा जमिनीवर पडला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 08:15 PM2020-08-08T20:15:46+5:302020-08-08T20:16:22+5:30

कोरोना लढाईत रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

Viral photo of health worker who rests prior to the burial of women body who died due to corona | Coronavirus: कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह दफन करण्यापूर्वी थकलेला कोविड योद्धा जमिनीवर पडला, अन्...

Coronavirus: कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह दफन करण्यापूर्वी थकलेला कोविड योद्धा जमिनीवर पडला, अन्...

Next

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळं जगातील प्रत्येक देशासमोर संकट उभं राहिलं आहे. आतापर्यंत १ कोटी ९० लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७ लाख ५० हजाराहून जास्त मृत्यू झाले आहेत. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा २० लाखांच्या वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा ४० हजारांच्या पुढे गेला आहे.  दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रत्येक देशासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

कोरोना लढाईत रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पीपीई किट्स घालून डॉक्टर कोरोना रुग्णांना वाचवत आहेत, म्हणून या डॉक्टरांना देवदूत म्हणून पाहिले जात आहे. अशातच सोशल मीडियावर एका कोविड योद्धाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. पीपीई किट्स घातलेला हा योद्धा जमिनीवर पडलेला चित्रात दिसत आहे.

रिपोर्टनुसार कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या महिला रुग्णांचा मृतदेह दफन करण्यापूर्वी कोविड योद्धा थकलेला होता. हा फोटो रॉटयर्सच्या फोटोग्राफर अदनान अबीदी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. जो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा फोटो आयएएस अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिल आहे की, कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह दफन करण्यापूर्वी थकलेला एक कोविड योद्धा. कोविड योद्धाचं योगदान इतिहासात नेहमी लक्षात ठेवले जाईल. हा फोटो दिल्लीचा आहे.

आतापर्यंत हा फोटो २ हजाराहून अधिक जणांनी लाईक्स केला आहे.  

 

Web Title: Viral photo of health worker who rests prior to the burial of women body who died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.