आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपला आहे एक खतरनाक साप, शोधून शोधून थकले लोक; बघा तुम्हाला दिसतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 01:08 PM2021-08-27T13:08:10+5:302021-08-27T13:09:27+5:30
Optical Illusion Photo : जास्तीत जास्त लोक अजूनही साप शोधत बसले आहेत. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्हीही या फोटोतील साप शोधू शकता.
सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून लोक कन्फ्यूज झाले आहेत. कारण या फोटोत एक खतरनाक साप (Snake) लपलेला आहे. ज्याला शोधणं कुणालाही जमेल असं नाही. पण ज्यांची नजर तेज त्यांना साप दिसला. पण जास्तीत जास्त लोक अजूनही साप शोधत बसले आहेत. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्हीही या फोटोतील साप शोधू शकता.
सोशल मीडियावर नेहमीच अशाप्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion Photo) असलेले फोटो शेअर करत लोकांना चॅलेंज देतात. अनेकदा काही लोक पझल शेअर करतात, तर कुणी फोटोवरून काही चॅलेंज देतात. अशात इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या एका अधिकाऱ्याने लोकांना या फोटोतील साप शोधण्याचं चॅलेंज दिलं आहे. जसं की, तुम्ही बघू शकता फोटोत एक झाड दिसत आहे. पहिल्यांदा तर हा फोटो तुम्हाला सामान्य वाटेल. पण या फोटोत साप लपलेला आहे, तो तुम्हाला शोधायचा आहे. चला तर मग लागा कामाला.
काही लोकांना या फोटोतील लपलेला साप दिसला आहे. तुम्हाला दिसला का? ट्विटरवर हा फोटो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. जर तुम्ही बारकाईने लक्ष देऊन पाहिलं तर एक साप झाडावर चकटलेला आहे. त्याचा रंग तंतोतंड झाडाच्या सालीसारखाच आहे. त्यामुळे ते सहजासहजी दिसत नाहीये. या फोटोला आतारपर्यंत ३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर दोनशे लोकांनी हा फोटो रिट्विट केलाय.