हे वेडींग फोटोशूट पाहून आश्चर्यही वाटेल आणि मनाला चटकाही बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 03:01 PM2018-11-19T15:01:05+5:302018-11-19T15:05:26+5:30
सोशल मीडियात तुम्ही भरपूर प्रमाणात वेडींग फोटोशूट केलेल्या कपलचे फोटो बघत असाल. अलिकडे याची चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे.
सोशल मीडियात तुम्ही भरपूर प्रमाणात वेडींग फोटोशूट केलेल्या कपलचे फोटो बघत असाल. अलिकडे याची चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे. अशात एक वेडींग फोटोशूट चर्चेत आलं आहे. सुंदर फोटो हे या वेडींग फोटोशूटचं चर्चेत येण्याचं कारण नाहीये. कारण आश्चर्यात टाकणारं आणि मनाला चटका लावून जाणारं आहे.
फेसबुकवर डेबी गर्लेक या नावाच्या महिलेने हे फोटो शेअऱ केले असून सोबतच एक पोस्टही लिहिली आहे. डेबीने ११ नोव्हेंबर २०१८ हे फोटो पोस्ट केलेत. काही वेळातच ही पोस्ट १ लाख ५३ हजारांपेक्षा अधिक लोकांनी शेअर केली तर ३ लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी यावर रिअॅक्शन दिले. आणि २८ हजार लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. डेबीने लिहिले की, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस ठरणार होता'.
अॅरिझोनातील टुसॉनमध्ये राहणाऱ्या डेबीचा होणारा पती रॅंडी जिमरमॅन आता या जगात नाहीये. लग्नाच्या काही दिवसाआधीच रॅंडीचा एका अपघातात मृत्यू झाला होता. पण डेबीने त्यानंतरही फोटोशूट केले. या फोटोंमध्ये रॅंडी बघायला मिळत आहे. पण त्यांचा फोटो ब्लर केला आहे. म्हणजे असूनही तो नसल्याचं त्यातून दिसतं.
हे फोटोशूट आयएसओ वीपी स्टुडिओच्या क्रिस्टी फोन्सेको यांनी हिने केलं. या अनुभवाबाबत ती सांगते की, 'हे एक वेगळ्याप्रकारचं काम होतं. पण या फोटोशूटचा भाग होऊन मला सन्मानित झाल्यासारखं वाटतं. डेबी आणि रॅंडी एकमेकांवर खूप प्रमे करत होते. दोघे आनंदी होते. या फोटोशूटमध्ये हसणं हे डेबीसाठी फार कठीण काम होतं. रॅंडी आता नाहीये, पण रॅंडी डेबीकडे बघतोय, तिला स्पर्श करतोय, त्यावर ती कसं हसेल तसं हसायचं होतं'.
डेबीने पोस्टमध्ये लिहिले की, 'गाडी सावधपणे चालवा. तुम्हाला नसतं माहीत की, समोरच्या गाडीवर एखाद्याचं संपूर्ण विश्व असतं. आज माझ्या लग्नाचा दिवस होता. माझ्या बेस्ट फ्रेन्डसोबत. सकाळी उठून आज मी वेडींग ड्रेस परिधान केला असता. याच दिवसाचे स्वप्ने मी नेहमी बघायचे'.